Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; म्हणून बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर..!

मुंबई :
किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभव केल्याच्या एक दिवसानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का बसला आहे. या मोसमातील इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याची आयपीएल मोहीम संपुष्टात आली आहे. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून राजस्थान रॉयल्सने याबाबतची माहिती दिली आहे. राजस्थानने म्हटले आहे की, स्टोक्सचे बोट मोडले आहे, त्यामुळे दुर्दैवाने आयपीएलचा सध्याच्या हंगाम तो खेळू शकणार नाही.

Advertisement

सोमवारी पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला बोटाच्या दुखापतीने ग्रासलेले असल्याचे राजस्थानने म्हटले आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा झेल पकडण्यासाठी स्टोक्सने डाय मारली, त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. दुखापतीमुळे स्टोक्सने या सामन्यात फक्त एकच षटक टाकले.

Advertisement

राजस्थानने असेही म्हटले आहे की, बेनने याही परिस्थीतीत आपला बहुमोल पाठिंबा देण्यासाठी संघाबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. यापूर्वी ब्रिटीश माध्यमांच्या अहवालात त्याच्या हाताला फ्रॅक्च र असल्याची चर्चा होती. ‘इंडिपेन्डंट’ या ब्रिटिश वृत्तपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला. त्याचबरोबर इसीबी आणि रॉयल्सच्या व्यवस्थापनामध्ये त्याच्या जखमेबाबत चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी त्याचा एक्स-रे येईल, त्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे हे स्पष्ट होईल.

Advertisement

दरम्यान, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू कोरी अँडरसन बेन स्टोक्सची जागा घेऊ शकेल. कीवी क्रिकेटपटूने मागील वर्षी निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता तो यूकेमध्ये फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. कोरी अँडरसनचा अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटशी ३ वर्षांचा करार आहे. अँडरसनला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलकडून खेळण्याचा अनुभव आहे. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply