Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून केकेआर चाहत्यांची शाहरुखने मागितली माफी

मुंबई :
कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध १० धावांनी लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. केकेआर फ्रेंचायझी टीमचा सह-मालक शाहरुख खानला या पराभवामुळे इतके दु:ख झाले की त्याने ट्विटरद्वारे केकेआर चाहत्यांची माफीही मागितली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आंद्रे रसेलने शाहरुखच्या या ट्विटबाबत प्रत्युत्तर दिले आहे. त्याने या ट्विटला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु हा सामना म्हणजे काय जगाचा अंत नाही असेही तो म्हणाला. तो म्हणाले की, या पराभवामुळे आम्ही सर्व निराश आहोत, पण केकेआर आगामी काळात जोरदार पुनरागमन करेल, असे तो म्हणाला.

Advertisement

रसेलने या परभावास खेळपट्टीला जबाबदार ठरवले.  इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघाने जवळपास संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले पण अखेरच्या षटकात संघाने कच खाल्ली आणि त्यांना १५३ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. केकेआरला शेवटच्या २७ चेंडूत केवळ ३० धावांची गरज होती, पण केकेआरच्या रसेल आणि दिनेश कार्तिकसारख्या मॅच फिनिशर खेळाडूंना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

Advertisement

१५ चेंडूत ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रसेलने सामन्यानंतर सांगितले की, फलंदाजी करण्यासाठी ही अवघड पीच होती. नवीन फलंदाजाला क्रीजवर उतरल्यावर लगेच शॉट खेळण्यास सुरवात करणे सोपे नव्हते. ते खूप आव्हानात्मक होते, असे तो म्हणाला. असमान बाऊन्समुळे खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड गेले. कितीही चांगला फलंदाज असला तरी त्याला लयीमध्ये येण्यासाठी काही बॉल खेळण्याची आवश्यकता असल्याचे तो म्हणाला.

Advertisement

रसेल म्हणाला, दुर्दैवाने चेंडू माझ्या आणि दिनेश कार्तिकसारख्या चांगल्या फिनिशर्सच्या बॅटवर येत नव्हता. माझ्या मते आम्ही काही बाउड्री मारल्या असल्या तर जिंकलो असतो.  शाहरुखच्या ट्विटबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नावर रसेल म्हणाला की, मी या ट्विटचे समर्थन करतो. नक्कीच आम्ही निराश आहोत, परंतु अद्याप सर्व काही संपलेले नाही. हा आमचा दुसरा सामना होता. रसेल म्हणाला की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि दमदार पुनरागमन करणार असल्याचे तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Shah Rukh Khan on Twitter: “Disappointing performance. to say the least @KKRiders apologies to all the fans!” / Twitter

Advertisement

Advertisement

Leave a Reply