Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : गेल्या वर्षी दिल्लीला फायनलला पोहचवणाऱ्या ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची बाधा..!

मुंबई :
कोरोनाची दुसरी लाट प्राणघातक ठरत असून दुसऱ्या लाटेदरम्यान देशात आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. आता सामने सुरू झाल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज एनिच नॉर्टजे कोविड पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Advertisement

दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नॉर्टजेचा समावेश करण्यात आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेल्या मंगळवारी मुंबईत दाखल झाला होता आणि सात दिवसांसाठी त्याला क्वारंटाईन ठेवणे अनिवार्य होते. यामुळे तो पहिला सामना खेळला नाही. आता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ वर्षीय नॉर्टजेला अलिप्त ठेवत त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

Advertisement

आयपीएल २०२१ मध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेला नॉर्टजे पाचवा क्रिकेटर आहे. यापूर्वी नितीश राणा, अक्षर पटेल, देवदत्त पडीकक्कल आणि डॅनियल सैम्स यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. देवदत्त आणि सैम्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि अक्षर पटेल व नॉर्टजे दिल्ली कॅपिटलचे खेळाडू आहेत.पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर नॉर्टजे आणि कॅगिसो रबाडा हे ५ एप्रिलला भारतात आले. दोन्ही खेळाडू ६ तारखेला मुंबईत संघासोबत जोडले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी केलेल्या अहवालात नॉर्टजेला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तथापि, रबाडाचा अहवाल नकारात्मक आहे.

Advertisement

मुंबईतील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नॉर्टजे उद्या संघात सामील होईल, अशी अपेक्षा होती पण आता ही प्रतीक्षा जास्त लांबेल. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या मोसमात आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यासाठी या वेगवान गोलंदाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply