Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून संजू सॅमसनच्या ‘त्या’ निर्णयामुळे पेटला वाद; पहा काय म्हणाले संगकारा, मांजरेकर

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रात पंजाब किंग्जविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती, कर्णधार संजू सॅमसन गोलंदाज अर्शदीप सिंगला हवेत शॉट मारला मात्र दीपक हूडाने त्याचा झेल पकडला. वास्तविक राजस्थान रॉयल्सला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्राइकवर होता आणि त्याला एक धाव घेण्याची संधी होती, पण दुसऱ्या टोकाला असलेल्या ख्रिस मॉरिसला त्याने धाव घेण्यास नकार देत त्याला माघारी पाठवले. आता याबाबत वाद निर्माण झाला असून राजस्थान रॉयल्स क्रिकेटचे संचालक कुमार संगकारा, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी यावर भाष्य केले आहे.

Advertisement

मांजरेकर यांनी ट्विटरवर लिहिले की, संजू सॅमसनने षटकार ठोकण्याची शक्यता अधिक होती. शेवटच्या चेंडूवर स्ट्राइक स्वत:जवळ ठेवण्याचा सॅमसनचा निर्णय योग्य होता. माजी भारतीय क्रिकेटपटू स्नेहल प्रधाननेही सॅमसनचा धाव न घेण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. संगकाराने सामन्यानंतर सांगितले की, मला वाटते की संजू संघाला विजयाकडे नेईल, अशी खात्री त्याला होती. तो सिमारेषेजवळ झेल देवून बाद झाला, काही यार्डवरून तो षटकार मारण्यास चुकला. खेळताना आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागते आणि संजू हे करत होता हे पाहून बरे वाटले. या सत्रात सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. त्याने ११९ धावांची शानदार खेळी साकारली, पण संघ जिंकू शकला नाही. मात्र, त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. कर्णधारपदी पदार्पणात शतक झळकावणारा सॅमसन आयपीएलचा पहिला खेळाडू ठरला आहे

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply