Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्या’ गावात झाला करोना स्फोट; एकाचवेळी तब्बल 93 लॉक झाले पॉझिटिव्ह..!

नांदेड :

Advertisement

कोरोना विषाणूचा कहर जोरात असतानाच महाराष्ट्रात आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका मेजवानीनंतर कोरोनाचा स्फोट झाला आहे. बुलढाण्यातील एकाच गावात त्यानंतर तब्बल 93 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यातील बर्‍याच जणांनी मेजवानीस उपस्थिती लावली. लाइव हिंदुस्तान या राष्ट्रीय माध्यम समूहानेही या बातमीची दखल घेतली आहे.

Advertisement

या घटनेनंतर स्थानिक अधिका्यांनी इथे कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे 700 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले पोटा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. एका स्थानिक अधिकार्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या तपासणी शिबिरात 15 गावकरी बाधित असल्याचे आढळले होते. आता काही दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दुसर्‍या चाचणीत तब्बल 78 लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. संसर्गाला बळी पडण्यापूर्वी बहुतेक लोक पोटा येथे मेजवानीला गेले होते.

Advertisement

गावजेवण घालून आनंद साजरा करण्याच्या या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. धार्मिक उत्सव साजरे करणे आणि लग्नसमारंभ कार्यक्रमामध्ये खर्च करून आपली श्रीमंती मिरवण्याची अनेकांना हौस असते. भारतात ही एक साधी आणि सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, सध्याच्या करोना कालावधीत हे खूप जड जात असतानाही त्याचा सोस काही सुटेना झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे गाव एक निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे आणि अधिकाधिक लोकांचा शोध घेण्यात येत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये स्थानांतरित केले जात आहे आणि लक्षणे नसलेल्यांना घरी आयसोलेट राहाण्यास सांगितले जात आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply