Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तर असा होता वाझेचा गेम प्लॅन; पहा ‘त्या’ अँगलचाही तपास सुरू केलाय एनआयएने

मुंबई :

Advertisement

अँटिलीया प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत जाते तसतसे अनेक रहस्ये जगजाहीर होत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी याबाबत म्हटले आहे की, सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची कार त्याच्या ठेवल्यानंतर सचिन वाझे हा 2 जणांना ठार मारण्याच्या तयारीत होता. ही स्फोटके ठेवल्याचा दोष त्याच दोघांवर टाकण्याचा त्याचा गेम प्लॅन होता. वाझेच्या घरातून पासपोर्ट मिळाल्यानंतर तपास यंत्रणा एन्काऊंटर अँगलचा तपास करत आहे.

Advertisement

इंडिया टुडेने एका अहवालात एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, वाझेला पासपोर्टधारक आणि एका अन्य व्यक्तीस संपवायचे होते. त्यानंतर जिलेटिनची कार अँटिलियाच्या बाहेर त्यांनीच ठेवल्याचे तो दाखवणार होता. मुंबई पोलिसांचा निलंबित अधिकारी सचिन वाझे हा सध्या स्फोटकांची कार पार्क करणे आणि कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएच्या ताब्यात आहे.

Advertisement

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची एसयूव्ही पार्क केलेली आढळली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझे यांची खरी योजना अशी होती की स्फोटकांची एसयूव्हीप्रकरणी दोन जणांना (एनआयएने ओळख उघड केली नाही) गोळ्या घालून ठार मारण्यात येऊन हे प्रकरणपोलिसांनी सोडवल्याचा दावा केला जाणार होता. असे सांगितले जात आहे की, औरंगाबादहून चोरी झालेल्या मारुती इको कारमध्ये दोन लोक चालवित होते आणि अँटिलीया बाहेर पार्क केलेल्या कारला आयईडी लावले जाईल. मात्र, हा प्रयत्न फसला. एनआयएने मिठी नदीतून या वाहनाची नंबर प्लेट जप्त केली आहे. परंतु वाझेला ‘प्लॅन ए’ कार्यान्वित करता आले नाही, मग त्याने ‘प्लॅन बी’ वापरला आणि मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ वापरण्यात आली.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply