Take a fresh look at your lifestyle.

ऐतिहासिक आठवण : आणि ‘कुंबळे+प्रसाद+अझर+सिद्धू’ने तो कप आणला चौथ्यांदा खेचून; वाचा रोमांचक किस्सा

मुंबई :
भारताने १९९५ मध्ये आजच्याच दिवशी चौथा एशिया कप जिंकला होता. १४ एप्रिल १९९५ ला मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले होते. शारजहाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Advertisement

सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला वेंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळेने जबरदस्त गोलंदाजीसह २३० धावांवर रोखले. २३१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्या दोन विकेट केवळ ५८ धावांत गमावल्या. सचिन तेंडुलकर ४१ आणि मनोज प्रभाकर ९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतले.

Advertisement

दोन विकेटनंतर फलंदाजीस आलेल्या मोहम्मद अझरुद्दीन आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या १७५ धावांच्या भागीदारीमुळे भारताने आठ विकेट्सने विजय मिळविला होता. सामन्यात सिद्धूने शानदार ८४ धावा केल्या आणि अझरुद्दीनने ९० धावांची शानदार खेळी केली. १९९५ चा  एशिया कप राऊंड रॉबिन पध्दतीने खेळला गेला जेथे प्रत्येक संघ दुसऱ्या संघाविरुद्ध खेळला आणि पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र झाले. आशिया चषकात एकूण ४ संघ होते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश.

Advertisement

राऊंड रॉबिन स्टेजनंतर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे प्रत्येकी ४ गुण होते. सरतेशेवटी, भारत व श्रीलंका संघांनी उत्तम रनरेटच्या आधारे अंतिम फेरीसाठी पात्रता दर्शविली. आशिया चषक आतापर्यंत १४ वेळा झाला आहे, त्यापैकी ७ वेळा आशिया चषक पटकाविण्यात भारत यशस्वी झाला आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply