Take a fresh look at your lifestyle.

अडचणीत वाढ; म्हणून ठाकरे सरकारविरोधात व्यापारी जाणार थेट न्यायालयात..!

मुंबई :

Advertisement

वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलेल्या लॉकडाऊनमध्ये जल्लोषात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करून यानिमित्ताने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी वेळोवेळी झाली आहे. आता ऐन मिनी लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

Advertisement

याबाबत कोणत्याही व्यापारी संघटनेने नाही, तर थेट महाराष्ट्र भाजपने माहिती दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर म्हटले आहे की, ठाकरे सरकारने हुकूमशाही कारभार राबवून राज्यात लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे आता व्यापारी बांधव पुरते त्रस्त झाले आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. सतत निर्बंध लादून जनतेला त्रास देणाऱ्या ठाकरे सरकारचा आता न्यायालयच योग्य फैसला करेल.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “@OfficeofUT सरकारने हुकूमशाही कारभार राबवून राज्यात लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे आता व्यापारी बांधव पुरते त्रस्त झाले आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. सतत निर्बंध लादून जनतेला त्रास देणाऱ्या ठाकरे सरकारचा आता न्यायालयच योग्य फैसला करेल. https://t.co/wW8iB9CYbw” / Twitter

Advertisement

भाजपने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आह की, राज्याची लोकसंख्या सध्या जवळपास १२ कोटी इतकी आहे. मात्र अन्न सुरक्षेचे लाभार्थी ७ कोटी नागरिक आहेत. मग उर्वरित ५ कोटींसाठी काही योजना आहे की नाही ? या ५ कोटी सामान्य नागरिकांनी उपासमारीने मरावं का ? हेच तुमचं नियोजन आणि तुमची मदत का मुख्यमंत्रीजी?

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “राज्याची लोकसंख्या सध्या जवळपास १२ कोटी इतकी आहे. मात्र अन्न सुरक्षेचे लाभार्थी ७ कोटी नागरिक आहेत. मग उर्वरित ५ कोटींसाठी काही योजना आहे की नाही ? या ५ कोटी सामान्य नागरिकांनी उपासमारीने मरावं का ? हेच तुमचं नियोजन आणि तुमची मदत का @OfficeofUT जी ? https://t.co/V4ApxbhRqf” / Twitter

Advertisement

पुढे असेही म्हटले आहे की, रिक्षाचालक, अधिकृत कामगार, फेरीवाले यांना ठाकरे सरकारनं आर्थिक मदत जाहीर तर केली. पण ही मदत खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचेल का, याचीही शंकाच आहे. ही फसवेगिरी रिक्षाचालकांच्याही लक्षात आली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply