Take a fresh look at your lifestyle.

हेल्थ स्कीम : दवाखान्याच्या खर्चाने बेजार; मग ‘ही’ योजना तुमच्या कामी येईल की..!

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघा महाराष्ट्र होरपळून निघत आहे. काही केल्या रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारही हतबल झाले आहे. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी जाहीर केली. महाराष्ट्रात काही दिवसांपासून रोज 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालये तुडुंब भरली आहेत. एका एका बेडसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे. इतर प्रकारचे रुग्णही त्यामुळे धास्तावलेले आहेत. अशावेळी करोना नाही मात्र, इतर काही आजारांना विमा संरक्षा देणारी सरकारची एक योजना आपण पाहूया की.. सध्या रुग्णालयातील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातही आरोग्य विमा नसल्यास पैशांची जुळवाजुळव करताना नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

Advertisement

तुम्ही आरोग्य विमा काढला नसला, तरी घाबरू नका. कारण, शासनाने तुमचा विमा काढलेला आहे. पण, तुम्हाला त्याची माहिती नाही..शासनाच्या या योजनेचे नाव आहे, महात्मा फुले जनआरोग्य योजना..या योजनेचा लाभ कसा मिळतो, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात, ती कशी मिळवायची, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

योजनेचा लाभ कसा घेणार?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयातील आरोग्यमित्रांची मदत घेता येते. योजनेचा समावेश असणाऱ्या रुग्णालयात हे आरोग्यमित्र उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत आरोग्यमित्र रुग्णाची ऑनलाईन नोंदणी करतात. रुग्णालयात उपचार घेतांना, योग्य ते सहाय्य करतात. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

Advertisement

योजनेतील जवळचं रुग्णालय कसं शोधणार?
महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या www.jeevandayee.gov.in वेबसाईटवर गेल्यानंतर ‘तुमच्या जवळच्या आरोग्यसेवा’ किंवा ‘Health Service Near You’ या लिंकवर क्लिक करा. नंतर तुमचा जिल्हा निवडा. रुग्णालयाचा प्रकार निवडा. कोणत्या प्रकराचा उपचार घ्यायचा आहे ते निवडा. तुमच्या जिल्ह्यातील योजनेशी संलग्नित रुग्णालयाची माहिती मिळेल.

Advertisement

किती रुपयांचं विमासंरक्षण?
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपयेपर्यंत विमासंरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे.

Advertisement

योजनेचा लाभ कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?
पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्नयोजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबंदेखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे, तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हेसुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

Advertisement

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?
योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र, यामध्ये आधारकार्ड, मतदारकार्ड, वाहनचालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र ग्राह्य धरली जातात.

Advertisement

लाभार्थी 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोनावरील उपचारांचादेखील समावेश करण्यात आला. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत 93,884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply