Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापुरी गुळालाही जीआय टॅग; ‘असा’ होणार शेतकरी-उत्पादकांना फायदा..!

कोल्हापूर :
कोल्हापूरचं नाव निघालं, तरी डोळ्यासमोर येते, कोल्हापुरी चप्पल, त्यांचं कुस्तीवरील प्रेम.. तेथील पहिलवान नि तालिम. आणखी एक राहिलंच की, आपला मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा. कोल्हापूरची खासियत असणाऱ्या अशा अनेक गोष्टी येथे आहेत. किंबहुना असेही म्हणता येईल, की या गोष्टीमुळेच कोल्हापूरची वेगळी ओळख झालीय.. मात्र, याशिवाय आता कोल्हापूरचं नाव आणखी एका गोष्टीसाठी फेमस झालंय.. ती आता कोणती, म्हणून काय विचारता? वाचा की खाली..!

Advertisement

कोल्हापुरी चपलेला ‘जीआय टॅग’ मिळाल्याचे तुम्हाला माहित असेलच! कोल्हापूर आता आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध झाला आहे. ते म्हणजे कोल्हापुरी गुळ. कारण, कोल्हापुरी गुळालाही आता ‘जीआय टॅग’ मिळालाय. कोल्हापुरी गुळ वेगवेगळ्या आकारात बनवला जातो. त्यामुळे दिसायलाही हा गुळ आकर्षक असतो. शिवाय  कोल्हापुरी गुळाची चवच न्यारी लागते ओ!

Advertisement

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती करतात. कोल्हापूर तर पहिल्यापासून सधन परिसर. मुबलक पाणी, कसदार शेती. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ऊसशेती केली जाते. त्यातूनच हा जिल्हा गुळ उत्पादनाचं मोठं केंद्र बनला. येथे जवळपास 1250 गुळउत्पादक युनिट आहेत. या ठिकाणी कोल्हापुरी गुळाची निर्मिती होते. कोल्हापुरी गुळाला जगभर ‘क्रेझ’ आहे. अगदी यूरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये सध्या कोल्हापुरी गुळाची निर्यात केली जाते. वाहतुकीची सोय चांगली असल्यानं देशभर गुळ पाठवला जातो.

Advertisement

जीआय टॅग म्हणजे काय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हा ‘जीआय टॅग’ काय आहे. तर एखाद्या उत्पादनाबाबत संबंधीत क्षेत्राला, व्यक्तींच्या गटाला किंवा संघटनेला ‘जीआय टॅगिंग’ केलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट फक्त एखाद्या भागातच उत्पादित होत असेल, तर त्याला ‘जीआय टॅग’ दिला जातो.

Advertisement

कशासाठी द्यायचा जीआय टॅग?
एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला ‘जीआय टॅग’ मिळाल्यास दुसरे कोणी त्याची नक्कल करु शकत नाही. ‘जीआय टॅग’ उत्पादनाचं भौगोलिक ठिकाण दर्शवण्यासाठीही वापरतात. भौगोलिक संकेतक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा 1999नुसार जीआय टॅग दिला जातो. जीआय टॅगिंग उद्योग संवर्धन, अंतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते.

Advertisement

जीआय टॅग मिळवण्यासाठी कोणतीही निर्मिती संस्था, संघटना किंवा राज्य सरकारही अर्ज करु शकते. अर्ज करण्यासाठी शुल्क भरावे लागते. अर्ज पडताळणी केल्यानंतर जीआय टॅग दिला जातो. एकदा दिलेला जीआय टॅग 10 वर्षांसाठी ग्राह्य धरला जातो. 10 वर्षांनंतर जीआय टॅगचं नुतनीकरण करावं लागते.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply