Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून झिम्बाब्वेच्या माजी कर्णधार हिथ स्ट्रीकवर आयसीसीने घातली ८ वर्षाची बंदी..!

मुंबई :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीकवर ८ वर्षांसाठी बंदी घातली आहे. भ्रष्टाचार विरोधी कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. ४७ वर्षीय हिथ स्ट्रिकने नोव्हेंबर १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे आणि १९९३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Advertisement

सुरुवातीच्या काळात स्ट्रीकने आपल्यावर ठेवलेले आरोप नाकारले होते, परंतु नंतर त्याने आपली चूक मान्य केली. आयसीसीचे सरव्यवस्थापक अलेक्स मार्शल म्हणाले की, अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असणारा आणि राष्ट्रीय संघास प्रशिक्षण देण्याचा अनुभव असणारा हिथ स्ट्रीक भ्रष्टाचारविरोधी अनेक प्रकरणांमध्ये सामील असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

The Guardian on Twitter: “Heath Streak handed eight-year ban for breaching ICC anti-corruption code https://t.co/SBt3pXG6p8” / Twitter

Advertisement

स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा महान वेगवान गोलंदाज मानला जातो. तो २०१७ आणि २०१८ दरम्यान प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. या कालावधीसह २०१६ पासूनच्या त्याच्या प्रकरणांची चौकशी सुरु होती. यादरम्यान  अनेक सामने खेळले गेले. यावेळी तो टी २० लीग आयपीएल, बीपीएल आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीगशी संबंधित होता.

Advertisement

स्ट्रीकने ६५ कसोटी सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीने १९९० धावा केल्या आहेत आणि २१६ बळी घेतले आहेत, तर १८९ एकदिवसीय सामन्यात त्याने २८ च्या सरासरीने २९४३ धावा केल्या आहेत आणि २३९ विकेट घेतल्या आहेत. स्ट्रीकने २३ टी २० सामने खेळले असून २४ विकेट्ससह २७ च्या सरासरीने ३३३ धावा केल्या आहेत. सन २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त झाला आणि इंग्लंडमधील वॉरविकशर क्रिकेट क्लबचा कर्णधार झाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

BBC Sport on Twitter: “Former Zimbabwe captain Heath Streak has been banned from all cricket for eight years for corruption offences. More ⤵️ #bbccricket” / Twitter

Advertisement

Advertisement

Leave a Reply