Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे भुवनेश्वर ठरला आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थचा विजेता.!

मुंबई :

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मार्च महिन्याच्या प्लेअर ऑफ द मन्थच्या विजेत्या खेळाडूंची घोषणा केली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू लिझेल ली यांना हा पुरस्कार मिळाला. भुवीने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या घरगुती मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरी बजावली होती, ज्यासाठी त्याला आयसीसीने मार्च महिन्यात प्लेअर ऑफ द मन्थ पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. भुवीने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.६५ च्या इकॉनॉमी दराने धावा देत ६ बळी मिळविले होते, तर पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६.३८ च्या इकॉनॉमी रेटने चार गडी बाद केले होते.

Advertisement

प्रदिर्घ आणि वेदनादायक विश्रांतीनंतर पुन्हा भारताकडून खेळणे मला आनंददायक वाटत होते, असे भुवीने आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी मी माझी तंदुरुस्ती आणि तंत्रावर बरेच काम केले. भारतासाठी पुन्हा विकेट घेणे चांगले वाटते. मी सुरुवातीपासूनच या प्रवासात माझी भागीदारी केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो. माझे कुटुंब, मित्र आणि सहकारी खेळाडू. आयसीसी व्होटिंग ॲकॅडमी आणि मला मार्च महिन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यासाठी मतदान केलेल्या सर्व चाहत्यांचे विशेष आभार.

Advertisement

भुवनेश्वरशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आणि झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्ससुद्धा या शर्यतीत होते. भारताचे माजी फलंदाज आणि आयसीसी व्होटिंग ॲकॅडमीचे सदस्य व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, दुखापतीमुळे भुवी जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. त्याने शानदार पुनरागमन केले आणि पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समधील इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांसमोर चांगली कामगिरी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीने भारताविरुद्ध चार एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतक झळकावत महिलांच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. भारताच्या पूनम राऊत आणि राजेश्वरी गायकवाड हेही या पुरस्काराच्या शर्यतीत होते.

Advertisement

प्रत्येक महिन्यात खेळाडूंच्या कामगिरीवर आणि त्या महिन्याच्या एकूण कामगिरीच्या आधारे तीन स्पर्धकांची निवड केली जाते. यानंतर जगभरातील चाहते, आयसीसी व्होटिंग ॲकॅडमी, ज्येष्ठ पत्रकार, माजी खेळाडू आणि प्रसारक आणि आयसीसी हॉल ऑफ फेमचे काही सदस्य मतदान करत असतात. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारतातील पत्रकार मोना पार्थसारथी या अकादमीचे सदस्य होते. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply