Take a fresh look at your lifestyle.

म्हणून परराज्यातील नागरिक व गाववाल्यांनी सोडलेय शहर; पहा नेमकी काय आहे महाराष्ट्रात परिस्थिती

पुणे :

Advertisement

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बुधवारपासून राज्यात कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर सर्वांनी आता पुढील 15 दिवस यासाठीची तयारी केली आहे. मात्र, यामुळे काही स्थलांतरित कामगार मूळ ठिकाणी परत जाऊ लागले आहेत. मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनससह पुणे शहरातील मुख्य रेल्वे स्थानक आणि बस अड्ड्यांमधून प्रवासी कामगार त्यांच्या मूळ राज्याकडे जाताना पाहिले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील गावाकडे जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी शिवम पांडे यांनी मुंबईत एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या वर्षी भारत बंद दरम्यान त्याने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्यामधून जाण्याची पुन्हा इच्छा नाही. आता कर्फ्यू लागू झाला आहे. मग अशावेळी मुंबईत येथे राहून काय करणार? मी आणि कुटुंब काय खाऊ? त्यामुळे आम्ही शहर सोडत आहोत. मागील वर्षी ऐनवेळी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये खूप त्रासात घरी जावे लागले होते. आम्ही सर्वांनी ते सर्व सहन केले होते. आता पुन्हा त्या संकटांतून जाण्याची इच्छा आमची नाही.

Advertisement

कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने झटक्यात लॉकडाउन जाहीर केला होता. त्यावेळी नंतरच्या काळात काही दिवस प्रवासी कामगारांची मोठी गर्दी देशभरातील रस्त्यावर दिसली. अनेकांचा त्या प्रवासात जीव गेला. अनेकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते. तथापि, खूप नंतर त्या मजुरांसाठी काही राज्य सरकारने गाड्यांची व्यवस्था केली होती आणि त्यांना त्यांच्या घरी नेण्यात आले होते. मात्र, त्यालाही खूप उशीर झाला होता. वर्षभरापूर्वीची ती व्यथा आणि कथा कोणीही विसरलेला नाही. त्यावेळी नंतर वेळोवेळी लॉकडाऊन वाढवण्यात आलेला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र सोडण्यासाठीची तयारी अनेकांनी केली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून कलम 144 लागू करण्यासह राज्यात 1 मे पर्यंत अनेक कडक निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. तथापि, त्यांनी या नवीन निर्बंधांना ‘लॉकडाउन” म्हटलेले नाही. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व आस्थापना, सार्वजनिक जागा, उपक्रम बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील कलम 144 लागू होईपर्यंत सिनेमा हॉल, थिएटर, सभागृह, करमणूक पार्क, जिम, क्रीडा संकुल बंद राहतील. महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सकाळी 7 या दरम्यान चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग रद्द करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर (आवश्यक सेवा वगळता) बंद राहतील.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply