Take a fresh look at your lifestyle.

पुणे पोलिसांनी दिला महत्वाचा संदेश; पहा ‘बाहुबली’चा तो सीन दाखवून काय म्हटलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

‘इतिहास एकट्याच्या जोरावर घडत नसतो, तो घडतो मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे..’ असा संदेश देणाऱ्या पुणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावर आज सकाळी एक महत्वाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. बाहुबली या सुपरडुपर हिट सिनेमातील युद्धाचा प्रसंग त्यात दाखवला आहे. त्यातून एकजुटीने करोना संकटावर मात करण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

Advertisement

बाहुबली चित्रपटातील कालकेय आणि माहिष्मती साम्राज्य यांच्यातील महायुद्धाचा प्रसंग पाहताना अंगावर काटा येतो. कालकेय हा साम्राज्याच्या सीमेवर येऊन ललकारी देतो आणि युद्धाला तोंड फुटते. त्यावेळी माहिष्मतीचे सैन्य स्वतःभोवती एक लोखंडी कडे बनवून संरक्षणाचा प्रयत्न करते. हे कडे तोडण्याचा प्रयत्न कालकेय याचे सैन्य करते. यात पुणे आणि महाराष्ट्र म्हणजे माहिष्मती आणि कालकेय सैन्य म्हणजे करोना विषाणू अशी मांडणी करून एकजुटीने लढण्याचा आणि करोना अर्थात कालकेय सैन्याला हरवण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. सध्या अनेकांना हा व्हिडिओ वेगळी आणि खास प्रेरणा देत आहे.

Advertisement

CP Pune City on Twitter: “Pune, watch this and let us know which side do all of us represent in this clip? Team ☠️ or Team 🛡️. Let’s #BreakTheChain. 🙏 #PuneFightsBack #Unity #LockdownMaharashtra https://t.co/zebeITJvnA” / Twitter

Advertisement

व्हिडिओमध्ये पुढे आवाहन करण्यात आलेले आहे की, स्टॉप.. डू विई नीड टू टेल यु.. व्हीच साईड आर विई हेअर..? पुणे.. आम्ही हे आधी केलं आहे.. आणि हे आम्ही पुन्हा करू शकतो.. ब्रेक द चेन..! फ़क़्त 1.21 सेकंदाच्या या व्हिडिओद्वारे खूप महत्वाचा आणि भावणारा व सोप्या शब्दातील संदेश पुणे पोलिसांनी दिला आहे. मिनी लॉकडाऊनची कदम अमलबजावणी करून करोना विषाणूची साखळी तोडण्याचे महत्वाचे आवाहन त्यात केलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply