Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून फेसबुकने घेतला ‘तो’ निर्णय; पहा कोणत्या देशांना बसलाय राजकीयदृष्ट्या फटका..!

मुंबई :

Advertisement

फेसबुकचा राजकीयदृष्ट्या वापर आता काही नवीन मुद्दा राहिलेला नाही. भारतातही त्याचा राजकीयदृष्ट्या वापर सुरू असल्याचे वेळोवेळी अनेक अहवालातून स्पष्ट झालेले आहे. त्याचवेळी बड्या देशांना खुश करून त्यांचे राजकीय धोरण छोट्या देशात प्रतिबिंबित करण्याचे कृत्यही आता या श्रीमंत कंपनीच्या नावावर आहे. एकूणच फेसबुकचा घोळ कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस आणखीनच वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने याची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सुमारे २५ देशातील सत्ताधारी गटाची बाजू घेताना आणि विरोधकांना त्रस्त करण्यासाठी तसेच जनतेलाही भ्रमित करण्याचे साधन म्हणून फेसबुकचा वापर झालेला आहे. फेसबुकच्या माजी डेटा सायन्टिस्ट सोफी झांग यांच्या हवाल्याने हा मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. सोफींना जानेवारी २०१८ मध्ये फेक एंगेजमेंट रोखण्यासाठी नियुक्त केले होते. तर, सप्टेंबर २०२० मध्ये खराब कामगिरीमुळे सोफींची हकालपट्टी केली होती.

Advertisement

 फेसबुकचे प्रवक्ता लिझ बर्जुओइस यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. सोफी झांग यांनी काम सोडतानाच कंपनीला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटलेले होते की, २०१६ च्या अमेरिकी निवडणुकीतही असेच प्रयत्न झाले होते. मतदारांच्या विभाजनासाठी फेसबुकच्या विरोधात अनेक प्रकारच्या जोडतोडीचे पुरावेही  आहेत. याबाबत कंपनीला कळवले आहे. राजकीयदृष्ट्या वापर हा जगातील इतर देशांवरही परिणाम करणारा आहे. मात्र, कारण कंपनी या प्रकरणाची दखल घेत नाही.

Advertisement

होंडुरास देशाचे राष्ट्रपती जुआन अर्नाल्डो हर्नांडेझ यांनी २०१८ मध्ये स्वतःच्याच समर्थनार्थ ९० टक्क्यांपेक्षा जास्त आणि लाखो फेक एंगेजमेंट कार्यालयातून पोस्ट केल्या केल्याची तक्रार कंपनीकडे केली होती, पण फेसबुकने कारवाई केली नाही, असेही त्यांनी म्हटलेले आहे. अफवांना हवा देऊन इतिहास बदलून सांगणाऱ्या पोस्ट चालवण्याचा प्रकार भारतात सुरू आहे. त्याला जोरात एंगेजमेंट मिळताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याकडे लक्ष वेढलेले होते. एकूणच या बातमीत भारताचे नाव नाही. मात्र, भारतात असे किती मोठ्या प्रमाणात होते हाही अभ्यासाचा मुद्दा आहे.

Advertisement

यातील महत्वाचे मुद्दे :

Advertisement
  1. फेसबुकने अमेरिका वा इतर संपन्न देशांना प्रभावित करण्यासाठी गरीब, लहान आणि गैर-पाश्चिमात्य देशांना आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करण्याची परवानगी दिलेली आहे.
  2. कंपनीने अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया आणि पोलंड आदि देशांत राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या मुद्द्यांबाबत तत्परता दाखवली असतानाच अफगाणिस्तान, इराक, मंगोलिया किंवा मेक्सिको, लॅटिन अमेरिकेच्या देशांच्या प्रकरणांत मुळीच हस्तक्षेप केला नाही.
  3. या बातमीने डेटा लीक व हेरगिरीसारख्या गंभीर आरोपांचा सामना करत असलेली फेसबुक कंपनी आता पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेपावरून संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply