Take a fresh look at your lifestyle.

करोना कवच : फ़क़्त 157 रुपयात घ्या ‘ही’ पॉलिसी; SBI ने आणली आहे खास स्कीम

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात करोनाची दुसरी लाट जोरात आहे. फ़क़्त मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ यासारख्या शहरांमध्येच नाही, तर अगदी गावोगावी सध्या करोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशावेळी करोना विषाणूची बाधा होऊन कोविड 19 आजार झाल्यास दवाखान्यात होणारा मोठा खर्च अनेकांच्या पोटात गोळा आणणारा ठरत आहे. अशा सर्वांसाठी आणि कोणतीही मेडिकल इन्शुरन्स पोलिसी (मेडी क्लेम / mediclaim / individual life insurance of corona rakshak) नसलेल्या मंडळींसाठी ही खास माहिती आहे.

Advertisement

पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशावेळी ही माहिती आपणास खूप उपयोगी ठरणार आहे. सध्या देशात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे, लसीकरण करण्याची प्रक्रियादेखील पूर्वीपेक्षा वेगवान झाली आहे. अशावेळी आपण कोरोना विषाणूच्या उपचाराच्या खर्चाबद्दल फारच चिंतित असल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI / State bank of India) कोरोना गार्ड विमा पॉलिसी (insurance policy) खरेदी करू शकता. येथे आपल्याला 50,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण फ़क़्त 157 रुपयात मिळेल.

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडिया कोरोना गार्ड पॉलिसीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी :

Advertisement
  1. ही आरोग्य विमा (mediclaim) संरक्षण योजना आहे.
  2. येथे तुम्हाला 100 टक्के कव्हर मिळेल.
  3. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी आपले वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  4. या पॉलिसीची किमान प्रीमियम 156.50 रुपये आहे आणि जास्तीतजास्त 2,230 रुपये आहे.
  5. ही एक टर्म पॉलिसी आहे. 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवस असा याचा कालावधी आहे.
  6. कोरोना गार्ड पॉलिसीवर तुम्हाला किमान 50 हजार रुपये ते 2.50 लाखापर्यंत कव्हर मिळेल.
  7. स्टेट बँक कोरोना गार्ड पॉलिसीमध्ये 105 दिवसांच्या योजनेसाठी तुम्हाला 157 रुपयांचे प्रीमियम द्यावा लागेल. ज्यावर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळेल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून पुढे जा : Corona Rakshak Policy, SBI Life Insurance Co. Ltd. | SBI Life http://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply