Take a fresh look at your lifestyle.

आणि बाबर आझमने असा दिला विराट कोहलीला झटका; पहा काय केलाय त्याने कारनामा..!

मुंबई :
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आता जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. नुकतीच पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. मालिकेच्या निर्णयाक सामन्यात बाबरने ९४ धावांची शानदार खेळी केली होती.

Advertisement

विराट कोहली आता आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच पाचव्या क्रमांकावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत बाबर आझमचे ८६५ रेटिंग गुण आहेत तर विराट कोहलीचे ८५७ रेटिंग गुण आहेत.

Advertisement

Abdul Ghaffar on Twitter: “It’s Official: Babar Azam World #1 Batsman in ICC ODI Ranking https://t.co/eejN4tpmFp” / Twitter

Advertisement

अफ्रिकेविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमाननेही शानदार फलंदाजी केली आणि त्याचा त्याला क्रमवारीतही फायदा झाला. ताज्या क्रमवारीत फखर जमान सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप २० फलंदाजांमध्ये विराट आणि रोहितशिवाय शिखर धवनही आहे. धवन १७ व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, कोहली आणि बाबर या दोघांची नेहमीच तुलना केली जाते व दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे खेळाच्या तिनही प्रकारात सध्या नेतृत्व करत आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Advertisement

Leave a Reply