Take a fresh look at your lifestyle.

पहा लॉकडाऊनच्या मुद्द्यावर नेमके काय म्हटलेय मुख्यमंत्री ठाकरेंनी..

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येसह गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेसोबत फेसबुक लाईव्हवर बोलत आहेत. त्यामध्ये त्यांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता आणि रेमडेसिवीरची मागणी या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते लॉकडाऊनच्या मुद्द्यावर काय बोलणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

ठाकरे यांच्या संवादातील मुद्दे असे :

Advertisement

राज्यातली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली जात आहे. त्यांच्याकडे रोजच्या रोज अहवाल जातो. आपण पारदर्शीपणे सगळ्या गोष्टींना धाडसाने तोंड देत असून काहीही लपवत नाही. आपल्याला आता चर्चा परवडणारी नाही. कारण हा कालावधी आपल्या हातातून गेला, तर आपल्याला कुणी वाचवू शकणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाहीयेत. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. 

Advertisement

उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान झाल्यानंतर तिथेदेखील निर्बंध लागू होतील. राज्यात १४४ कलम लागू होणार आहे. पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

CMO Maharashtra on Twitter: “मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/CFhPVDEiS9” / Twitter

Advertisement

सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू असून इतर सर्व सेवा बंद असतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद नसून लोकल, बस सुरू राहतील. त्यातून फ़क़्त अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठीची सोय असेल. महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना (संख्या १२ लाखांपर्यंत), अधिकृत फेरीवाल्यांना आणि नोंदणीकृत घरेलू कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य आणि निधी देत आहोत. फेरीवाल्यांचे पैसे थेट बँक खात्यांमध्ये जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे. तर, १२ लाख परवानाधारक शेतकऱ्यांना १५०० रुपये आणि आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये दिले जातील.

Advertisement

उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला ३ महिन्यांची तरी मुदतवाढ देण्याची विनंती केंद्राला केली आहे. करोनाला इतर नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आले आहे त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे. ब्रिटनने अडीच ते तीन महिने लॉकडाऊन लावून जवळपास ५० टक्के जनतेला लसीकरण केल्याचा मुद्दा ठाकरे यांनी मांडला. तेथील रुग्णालयावरचा ताण कमी, मृत्यूदर कमी झाल्याकडे लक्ष वेधून महाराष्ट्राला त्याच मार्गाने जाण्याची गरज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

कोविडची दुसरी लाट थोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण अगोदरही एकदा त्याला थोपवले होते. आताही एकदिलाने त्या संकटाला सामोरे जाऊन करोनाला हद्दपार करू. सध्या आरोग्य सुविधा तोकडी पडताना आपल्याला दिसत आहे. आपण जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणार आहोत. निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना मी आवाहन करतोय, की तुम्ही सगळ्यांनी मदतीला, लढायला पुढे या, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

Advertisement

भाजप आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या लॉकडाऊन विरोधी आणि एकूण आरोग्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणाचा ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही उणीदुणी काढण्याची वेळ आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे यासाठी पुढे यावे. देशातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना ई पंतप्रधान यांनाही मी असेच आवाहन करीत आहे. उणीदुणी काढून राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply