Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : तर, ‘त्या’ला मिळणार नाही मुंबईच्या संघात स्थान; पहा कोणता असेल संभाव्य संघ ते

मुंबई :

Advertisement

आज इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. आयपीएलचा सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या सामन्यात बदल पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, याची अधिकृतरीत्या घोषणा झालेली नाही. एकूण माहिती आणि सूत्रांच्या आधारे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

पहिल्या सामन्यात रोहित शर्मासह डावाची सुरुवात करणाऱ्या ख्रिस लिनला कदाचित बाहेर बसावे लागू शकते आणि क्विंटन डिकॉकची हा त्याच्या जागेवर खेळेल असे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून आगमन झाल्यानंतर क्विंटन डिकॉक हा आयसोलेशनमध्ये असल्याने पहिला सामना खेळता आला नव्हता.

Advertisement

डिकॉकच्या आगमनाने संघाची क्रमवारी आणखी मजबूत होईल. डिकॉक चांगला फॉर्मात असून नुकताच पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात त्याने 80 धावा केल्या होत्या. तर आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा दुर्दैवी धावबाद झाला होता. ख्रिस लिनबरोबर त्याचा ताळमेळ गडबडलेला दिसला होता. डिकॉक आणि रोहितने मुंबई इंडियन्ससाठी एकत्र बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे या दोन फलंदाजांमध्ये चांगला तालमेल लक्षात घेऊन हा बदल होईल असे म्हटले जात आहे.

Advertisement

याखेरीज मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची चिन्हे नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्सला दोन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी मिळून मुंबई इंडियन्सने दिलेले 160 धावांचे लक्ष्य गाठले होते. गोलंदाजीत मार्को जानसेन आणि जसप्रीत बुमराहने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. तर, ख्रिस लिन आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती.

Advertisement

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, मार्को जानसेन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.  

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply