Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : केकेआरच्या संघात ‘हे’ 11 जण खेळणार; पहा हरभजन सिंगबाबत काय निर्णय होईल ते

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सीजन 2021 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या टीमसमोर मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान आहे. IPL मध्ये सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून मुंबईची ओळख आहे. या दोन्ही टीम आपापला दुसरा सामना खेळतील. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दोन विकेटने पराभव झाला, तर केकेआरने सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले होते.

Advertisement

पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हरभजन सिंग यांना स्थान होते. मात्र, केकेआरसाठीच्या त्या पहिल्या सामन्यात त्याला केवळ एका षटकाची गोलंदाजीची संधी मिळाली. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम 11 मध्ये हरभजनसिंग असणार किंवा नाही याचीच चर्चा आहे. केकेआरकडे बॉलिंगचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या जोरदार गोलंदाजीचा सामना करताना केकेआर मजबूत फलंदाजीसह बाहेर पडण्याची संधी शोधेल. यासाठी हरभजनसिंगला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येईल अशीच शक्यता आहे.

Advertisement

अशावेळी त्याच्या जागी शेल्डन जॅक्सनला संधी मिळेल. जॅक्सनने आतापर्यंत एकूण चार फ़क़्त आयपीएल सामने खेळले आहेत. परंतु अलीकडेच त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत केकेआरची फलंदाजीची व्यवस्था थोडी अधिक भक्कम करण्यासाठी त्याला संधी मिळू शकते. अशावेळी नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक, साकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, प्रख्यात कृष्णा, वरुण चक्रवर्ती यांना संघात स्थान असेल.

Advertisement

शेवटच्या सामन्यात नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी शानदार फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा दोघांकडूनही संघाला अशीच अपेक्षा आहे. आंद्रे रसेल फलंदाजीमध्ये फ्लॉप झाला मात्र, त्याने गोलंदाजी करून आपली छाप सोडली. प्रसिद्ध कृष्णा यानेही शानदार गोलंदाजी केली आणि त्याव्यतिरिक्त पॅट कमिन्स देखील संघाच्या गोलंदाजीच्या ताफ्यात आहे. तर, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्ती फिरकी विभाग सांभाळताना दिसू शकतात.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply