Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : आज होऊ शकते मोठी घोषणा; संध्याकाळी 8.30 ला मुख्यमंत्री येणार लाइव्ह

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता असून लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी केले आहे. मात्र, सणासुदीचा कालावधी आणि व्यापाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून केली जात असलेली विरोधाची भाषा लक्षात घेऊन हा निर्णय लांबणीवर टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे संध्याकाळी 8.30 ला लाइव्ह संवाद साधणार आहेत.

Advertisement

राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने ट्विटरवर म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करतील. त्यामुळे या संवादातून ठाकरे सरकार नेमकी कोणती महत्वाची घोषणा करणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

MAHARASHTRA DGIPR on Twitter: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करतील. https://t.co/6AHPsfmKvZ” / Twitter

Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर मंत्र्यांनी वेळोवेळी लवकरच लॉकडाऊन लागू करण्याचे सांगून जनतेची मानसिकता तयार केली आहे. यातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा आरोग्याची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे आज संध्याकाळी कोणती घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply