Take a fresh look at your lifestyle.

ठाकरेंच्या लॉकडाऊनवर सुप्रिया सुळे यांनी घेतली ‘ही’ भूमिका; पहा काय म्हणणे आहे त्यांचे

पुणे :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करून राज्यात पुढील 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. तुअला त्यांनी लॉकडाऊन न म्हणता ‘ब्रेक दि चेन’ चे नवे आदेश म्हटले आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका केली आहे. तर, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असेलेल्या राष्ट्रवादीने सकारात्मकता दर्शवली आहे.

Advertisement

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, शासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा. स्वतः सुरक्षित रहा व आपल्या कुटुंबीयांना देखील सुरक्षित ठेवा. परंतु यासोबतच सर्वसामान्य व कष्टकरी जनतेसाठी आवश्यक उपाययोजनाही जाहिर केल्या आहेत. नागरिकांना माझे आवाहन आहे की,कोरोना विषाणूंची ही साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे अगदीच तातडीची गरज असेल तरच घराबाहेर पडा. मास्क-सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे तंतोतंत पालन करा. राज्यासह देशभरात #कोविड१९ चे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे नाईलाजास्तव दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून १५ दिवस कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केले.

Advertisement

Supriya Sule on Twitter: “राज्यासह देशभरात #कोविड१९ चे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे नाईलाजास्तव दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून १५ दिवस कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केले.” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply