Take a fresh look at your lifestyle.

ठाकरेंच्या लॉकडाऊनवर फडणवीसांची आली पहिली प्रतिक्रिया; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मिनी लॉकडाऊन आणखी कडक करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर अनेकांनी पाठींबा दिला आहे, तर भाजपसह काही पक्ष व संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका ट्विटर ममांडली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स,रेमडेसिवीर,ऑक्सिजन,ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल. कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.

Advertisement

पुढे त्यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण,बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे. (2/4) #CoronaInMaharashtra” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply