Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर केले भाष्य; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडली आहे. एकूण भाजपचा पूर्वीचा आवेश लक्षात घेता आजच्या फेसबुक लाइव्हनंतर अनेकांनी काहीअंशी का होईना टीका सुरू केली. त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र, जनतेला या कठीण काळात सरकारला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, Corona ची वेदना आणि आपल्या संवेदना पुढचे 14 दिवस,.. कठीण नक्कीच पण काळजी घ्या.. मास्क घालणे, हात धुणे, social distance पाळणे ..शक्य तेवढे दाराच्या आत थांबा आणि Corona ला घराबाहेर थांबवा ..” साखळी तोडा Corona चा डाव मोडा”..

Advertisement

त्यांनी अशी समंजस भूमिका घेतल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर यानिमित्ताने पुन्हा एकदा टीका केली आहे.

Advertisement

Pankaja Gopinath Munde on Twitter: “Corona ची वेदना आणि आपल्या संवेदना पुढचे 14 दिवस,.. कठीण नक्कीच पण काळजी घ्या.. मास्क घालणे, हात धुणे, social distance पाळणे ..शक्य तेवढे दाराच्या आत थांबा आणि Corona ला घराबाहेर थांबवा ..” साखळी तोडा Corona चा डाव मोडा”..” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply