Take a fresh look at your lifestyle.

संकटात आली आशादायक बातमीही; ‘त्या’ कंपनीच्या औषधाने मिळणार करोनावर नियंत्रण

जगभरात सध्या करोनाची लाट आलेली आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येचे आकडे भयंकर वाढले आहेत. अशावेळी लसीकरण प्रक्रिया वेगाने करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यातच एक आशादायक बातमी आलेली आहे. ती म्हणजे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक औषध येण्याची शक्यता आहे. त्या औषधाचा प्रभाव 81 टक्के असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

सर्व देशांमध्ये लसीकरण मोहीम प्राथमिक अवस्थेत आहे. दरम्यान, अमेरिकेत केलेल्या एक संशोधनातून आशेचा किरण जागृत झाला आहे. फार्मास्युटिकल कंपनी रेगेनोरने लॅबमध्ये अँटिबॉडीजचे कॉकटेल औषध विकसित केली आहे. यामुळे कोरोना संक्रमणापासून संरक्षण होत असल्याचा दावा आहे. हे कॉकटेल औषध कोरोना झालेल्या लोकांची स्थिती गंभीर होण्यापासून प्रतिबंधित करत असल्याचेही म्हटलेले आहे. मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोगांचे डॉक्टर राजेश गांधी यांनी या अभ्यासाचा डेटा आशाजनक असल्याचे वर्णन केले. गांधींच्या म्हणण्यानुसार, ज्यांना अद्याप ही लस मिळालेली नाही त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खूप उपयुक्त आहे.

Advertisement

याच्या क्लिनिकल चाचणीचे निकाल खूप उत्साहवर्धक आहेत. म्हणून कंपनीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपाय म्हणून याचा वापर करण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मागितली आहे. या मोनोक्लोनल अँटिबॉडीज कॉकटेलच्या क्लिनिकल चाचणीचे परिणाम सोमवारी जाहीर करण्यात आले. मोनोक्लोनल हे अँटिबॉडीज लॅबनिर्मित प्रथिने आहेत जी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीस विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करतात. अभ्यासाच्या निकालांनुसार या औषधांमुळे कोरोना रूग्णामध्ये राहिलेल्या लोकांना विषाणूच्या संक्रमणापासून वाचवणे शक्य झालेले आहे.

Advertisement

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधक आणि डॉक्टर मोरान कोहेन यांच्या म्हणण्यानुसार बरेच लोक आहेत ज्यांना हे औषध दिले जाऊ शकते. रीगेनरॉनने आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त लोकांवर याच्या क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत. हे लोक त्याच घरात राहिले होते जेथे कोरोनाचा रुग्ण 4 दिवसात सापडला होता. ज्या लोकांना अँटीबॉडी कॉकटेल इंजेक्शन दिले गेले होते त्यांच्यात इंजेक्शन न मिळालेल्या लोकांपेक्षा 81 टक्के इतका संक्रमणाचा धोका कमी आढळला आहे.

Advertisement

रेजेनरॉनचे हे कॉकटेल दोन औषधांचे मिश्रण आहे. जे शरीरात अँटिबॉडीज तयार करतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनामुळे आजारी पडल्यावर त्यांनाही हे इंजेक्शन दिले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठीच्या या औषधास आणीबाणीमध्ये वापर करण्याची परवानगी होती. परंतु यास तयार होण्यास बराच वेळ लागल्याने आणि उपयोगात आणतानाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना शोधण्याच्या कारणावर काम चालू होते. तसेच काही रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार यात काही अडचणी आहेत. त्यामुळे रुग्णालये प्राधान्याने ते वापरत नाहीत. हे इंट्राव्हेनस इंजेक्शन आहे म्हणजे ते थेट नसमध्ये दिले जाते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply