Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून आर-टीपीसीआर टेस्टमध्येही सापडेनात विषाणू; पहा नेमके काय आहे प्रकरण

भारतात कोरोनाची दुसरी लाट विनाशकारी आलेली आहे. नवा विषाणूचे प्रकार पूर्वीपेक्षा जास्त संक्रामक असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नवीन प्रकार इतका धोकादायक आहे की बर्‍याच प्रकरणांमध्ये आर-टीपीसीआर चाचणी करूनही या विषाणूचा संसर्ग आढळला नाही. मात्र, ते रुग्ण करोना विषाणूचे बाधित असल्याचे नंतर स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

आतापर्यंत आरटी-पीसीआर ही चाचणी कोरोना संसर्ग शोधण्यासाठी सर्वाधिक बेस्ट मानली जाते. मात्र, दिल्लीतील बर्‍याच हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार असे अनेक रुग्ण सापडले आहेत जे कोरोनाची लक्षणे दाखवत आहेत पण ही टेस्ट नकारात्मक येत आहे. अनेक वेळा आरटी-पीसीआर करूनही निकाल निगेटिव्ह येत असल्याने वैद्यकीय यंत्रणा चक्रावली आहे.

Advertisement

आकाश हेल्थकेअरचे संचालक डॉ. आशिष चौधरी यांनी टाईम्स ग्रुपला याबाबत सांगितले आहे की, असे बरेच रुग्ण आले आहेत ज्यांना ताप होता, श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि फुफ्फुसाचे स्कॅन केल्यानंतर हलके रंगाचे किंवा राखाडी रंगाचे डागही दिसून आहे. ही सर्व कोरोनाची प्रसिद्ध लक्षण असतानाही त्या रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. अशा प्रकारच्या रूग्णांना तोंडात किंवा नाकात लवचिक उपकरण टाकून थेट फुफ्फुसांमध्ये नेले गेले. तेथील द्रवपदार्थाद्वारे संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यावरच हे रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी झाली. या प्रक्रियेस ब्रॉन्कोलवेलार लैवेज (BAL) म्हणतात.

Advertisement

मॅक्स हेल्थकेअरच्या पल्मोनोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विवेक नांगिया यांनी म्हटले आहे की, 15-20% रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागला आहे. रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे दिसतात परंतु त्यांची चाचणी नकारात्मक येते. अशा रूग्णांना कोरोना रुग्णालयाऐवजी सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले तर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. तसेच संसर्ग न सापडल्यामुळे उपचारही लांबणीवर पडतात. रुग्णांच्या लक्षणांमध्ये बराच बदल झाला आहे. त्यामुळे विषाणूचे उत्परिवर्तन (म्यूटेशन) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply