Take a fresh look at your lifestyle.

मॉन्सून अंदाज : स्कायमेटने जाहीर केले प्रेडीक्शन; पहा नेमका कसा आणि किती पडणार पाऊस

पुणे :

Advertisement

हवामान अंदाज आणि कृषि रिस्क सोल्यूशन क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी असलेल्या स्कायमेटने 2021 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या चार महिन्यांतील सरासरी पाऊस 103% (त्रुटी मार्जिन +/- 5%) इतका होण्याची शक्यता आहे.

Advertisement

स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी असेल. कर्नाटकातही मध्य भागात जुलै-ऑगस्टच्या मुख्य महिन्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मान्सूनचा सुरुवातीचा महिना जून आणि अखेरचा महिना सप्टेंबर या दोन्ही महिन्यात देशभरात व्यापक क्षेत्रावर चांगल्या पावसाचे संकेत आहेत.

Advertisement

SkymetWeather on Twitter: “प्रशांत महासागर में पिछले वर्ष से ला नीना की स्थिति बनी हुई है और अब तक मिल रहे संकेत इशारा करते हैं कि पूरे मॉनसून सीज़न में ENSO तटस्थ स्थिति में रहेगा। #Weather #WeatherForecast #Monsoon2021 #monsoon https://t.co/z5IVuwiRg6” / Twitter

Advertisement

स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी म्हटले आहे की, ला निनाची स्थिती गेल्या वर्षापासून तशीच राहिली आहे आणि आतापर्यंतचे संकेत असे सूचित करतात की संपूर्ण मान्सून हंगामात ईएनएसओ (ENSO) तटस्थ स्थितीत असेल. पावसाळ्याच्या मध्यभागी महासागराच्या मध्यवर्ती भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान पुन्हा कमी होण्यास सुरवात होईल. तथापि, समुद्राच्या पृष्ठभागावर थंड होण्याची ही प्रक्रिया अत्यंत संथ असेल. या आधारावर, असे म्हणता येईल की यंदाच्या पावसाळ्यात मॉन्सून खराब करणारा एल निनोचा उदय होण्याची शक्यता नाही.

Advertisement

इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या तटस्थ स्थितीत आहे आणि त्याचा नकारात्मक कल आहे. तथापि त्याचा तितकासा परिणाम होणार नाही. कारण, याचे गुणोत्तर जास्त असणार नाही. अशा परिस्थितीत येणाऱ्या पावसाळ्यास मान्सून 2021 कमकुवत होणार नाही. मान्सूनवर होणारा आणखी एक महत्त्वाचा समुद्री बदल म्हणजे मैडेन जूलियन ओशिलेशन (MJO) असतो. जो सध्या हिंद महासागरापासून खूप दूर आहे. संपूर्ण मान्सून हंगामात तो हिंद महासागरातून साधारणपणे 3-4 वेळा जातो. पावसाळ्यावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल आताच काही सांगणे योग्य राहणार असेही स्कायमेटने म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply