Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : वडेट्टीवार कडाडले; लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांनी म्हटले की..

मुंबई :

Advertisement

देशभरात करोना विषाणूची दुसरी लाट फोफावत आहे. अशावेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तर अनेकांची चिंता वाढवणारी आहे. आजही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चार शब्द सुनावले आहेत. तसेच ‘मुदत संपलेली इंजेक्शन विकणं हा देशद्रोहच आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये असे आवाहन करताना वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी अचानक लॉकडाउन लावल्यावर अजिबात सवड दिली नव्हती. तरीही व्यापारी व सर्वांनी गपगुमान तो निर्णय मान्य केला. त्यावेळी ती गरज होती, तशी आजही आहे. त्यामुळे कोणीही यास विरोध करू नये. संकटाच्या या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये.

Advertisement

व्यापाऱ्यांना इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी साथ नाही दिली तर त्यासाठी तेच जबाबदार असतील. राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान १४ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे. यावर अंतिम अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच असेल. लॉकडाऊन करताना कामगारांना किंवा घरापासून दूर असलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेळ दिला जाईल. लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Maharashtra Times on Twitter: “NAGVAC च्या प्रस्तावाला केंद्र सरकारची परवानगी #CoronaVaccine https://t.co/YUK7eRP0j0 via @mataonline” / Twitter

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply