Take a fresh look at your lifestyle.

‘वंचित’ने मांडला ‘तो’ महत्वाचा मुद्दा; पहा नेमका काय टोमणा हाणलाय मुख्यमंत्र्यांना

पुणे :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोना संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटकपक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचारात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशावेळी मनसे या राज ठाकरे यांच्या राजकीय पक्षालाही चर्चेत समाविष्ठ केले जात आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीने बेदखल केली आहे.

Advertisement

याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचे काम आता स्वतः वंचित बहुजन आघाडीने केले आहे. त्यांनी ट्विटरवर हा महत्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लक्षावधी लोकांनी मतदान केलेल्या वंचित बहुजन आघाडीला लॉकडाऊनसंदर्भात “सर्वपक्षीय” बैठकीला बोलावत नाही याचे काय कारण असेल?आम्ही अलुतेदार बलुतेदारांचे प्रश्न मांडतो म्हणून?कामगार कारागिरांचे प्रश्न मांडतो म्हणून? याला तुमची मनुवादी मानसिकता का म्हणू नये?

Advertisement

Vanchit Bahujan Aaghadi on Twitter: “लक्षावधी लोकांनी मतदान केलेल्या वंचित बहुजन आघाडीला @CMOMaharashtra लॉकडाऊनसंदर्भात “सर्वपक्षीय” बैठकीला बोलावत नाही याचे काय कारण असेल?आम्ही अलुतेदार बलुतेदारांचे प्रश्न मांडतो म्हणून?कामगार कारागिरांचे प्रश्न मांडतो म्हणून? याला तुमची मनुवादी मानसिकता का म्हणू नये? @OfficeofUT” / Twitter

Advertisement

यावर आनंद सोनवणे यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांसोबत चर्चा करू बोलले आणि फक्त भाजपचे देवेंद्र आणि त्यांच्याच सत्तेतील लोकांसोबत चर्चा केली. याचा परिणाम तुम्हाला नक्की दिसेल. अशा पद्धतीने सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. एकूणच आता महाविकास आघाडी किंवा शिवसेना विरुद्ध वंचित आघाडी यांच्यातही राजकीय लढाई आणखी तेजीत येण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply