Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘फिर आई गांव की याद..’; देशातील प्रमुख शहरातून ‘काफिले निकले गाव की ओर..!’

मुंबई :

Advertisement

सध्या करोना विषाणूची दुसरी लाट देशभरात फोफावली आहे. यामुळे रुग्णसंख्या नवीन विक्रमासह वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन होण्याच्या चर्चेला वेग आलेला आहे. दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने आता टाळेबंदी हाच अंतिम पर्याय असल्याने आणि रुग्णसंख्या व मृत्युदर वाढत असल्याने देशभरातील गावोगावच्या मजूर आणि नोकरदारांनी पुन्हा एकदा गावाकडे जाण्याची तयारी केल्याचे चित्र आहे.

Advertisement

फ़क़्त मुंबई नाही, तर ज्या शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले आहे, अशा सर्व शहरातून सध्या परप्रांतीय मजूर, गरीब कष्टकरी आणि नोकरदार आपल्या गावाच्या ओढीने निघत आहेत. मुंबईत रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि इतर छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहतीत असेच चित्र आहे. मजूर निघाल्याने पुन्हा एकदा हॉटेल मालकांचे टेन्शन वाढले आहे.

Advertisement

दोन-चार दिवसात संध्याकाळपासून कधीही महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर केले जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार त्याच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचवेळी दिल्लीमध्ये कोरोना परिस्थिती अनियंत्रित होत आहे. देशातील बर्‍याच राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. अशा परिस्थितीत लोक आणि परप्रांतीय मजुरांची घरी परतण्याची ओढ कायम आहे. परिणामी रेल्वे स्थानक आणि बस तळांवर स्थलांतरितांचा मेळावा जमा होत आहे. ते लांबलचक मार्गाने त्यांच्या गाड्यांची आणि बसेसची वाट पहात आहेत.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply