Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : पाण्यात उडी तिची, पण खड्डा लोकांच्या काळजात..!

‘तिने उडी पाण्यात मारली; खड्डा मात्र लोकांच्या काळजात पडला. महिलांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली पाहिजेच..’ असे म्हणून गणेश शिंदे (सरकार) यांनी एका महत्वाच्या आणि वेगळ्या अशा मुद्द्याला हात घातला आहे. त्यांनी सामाजिक दांभिकता आणि मानवाची गरज यांची सांगड घालून हा उदाहरणवजा लेख लिहिला आहे.

Advertisement

दीड दोन हजार लोकसंख्या असणारं आमचं गाव. साधारणतः लोकांची कुटुंब ही शेतीवरती अवलंबून असलेली आहेत. महिला घरकाम करून शेतीमधील कामे करताना दिसतात. मग शेळ्या, जनावरे सांभाळणे, पिकांना पाणी देणं, अशी श्रमाची कामेसुद्धा महिला मोठ्या प्रमाणात करतात. मुख्यतः शेतीचा शोध महिलांनी लावला आहे. तेंव्हापासून आजतागायत पुरुषांच्यापेक्षा जास्त श्रम हे महिला करतात. तसेच जास्तकाळ श्रम करण्याची त्यांची क्षमता दिसून येते.

Advertisement

काही वर्षांपूर्वी आमच्या गावात एक नवीनच लग्न होऊन आलेली एक नवविवाहिता होती. साहजिक अंगाची हळद पुसली नसेल तशी शेतीच्या कामाची लहानसहान जबाबदारी तिच्यावर पडायला लागली. कुटुंब शेतीवर आधारित असल्याने काम करणे साहजिक आहे. रोजच्या शेतातील कामाच्या व्यापात कंटाळून एक दिवस दुपारी तिने विरंगुळा म्हणून विहरित पोहायला उडी मारली. साहजिक उन्हाचा तडाखा पडलेला असल्याने तिने “आज कुछ तुफानी करते है”! म्हणत शेताच्या जवळच्या विहरीत मस्त पोहण्याचा आनंद लुटला. एकंदरीत गावात या गोष्टीचे कौतुक व्हायला पाहिजे होते. मात्र, या गोष्टीला खास करून महिलांनी कुजबुज करत हे कसे ‘संस्कार नसण्याचे काम’ आहे अशी चर्चा सुरू केली. विहरीमध्ये उडी जरी तिने मारली असली तरीही खड्डा मात्र लोकांच्या काळजात पडला होता. कित्येक वर्ष झाली अजुन बुजला गेला नाही.

Advertisement

विनोदाचा भाग सोडला तर आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. गावातील कुटुंबे ही मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहेत. शेती आली की विहीर आलीच. महिलांचा आणि विहिरीचा, अडाचा संबंध हा मोठ्या प्रमाणात येतो. पाणी शेंदने असेल, कपडे नदीवर, धरणावर धूने असेल अशा ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळा जावे लागते. पाण्यात पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यात महिलांचे प्रमाण हे जास्त आहे; मात्र याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. वयात यायला लागले की मुलांना विहरीवर, तळ्यावर, नदीवर पोहायला शिकवले जाते. मात्र तुलने मध्ये मुलींना शिकवले जात नाही. त्यांच्या जिवाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी गोष्ट मुलींनी उघड्यावर पाण्यात कसे पोहावे, अंघोळ कशी करावी अशा गोष्टी समोर करत दुर्लक्ष केले जाते.

Advertisement

विद्यार्थांना शालेय शिक्षण घेत असताना अशा गोष्टींचे शिक्षण द्यायला पाहिजे किंवा एक जबाबदार कुटुंब म्हणून, जबाबदार समाज म्हणून आपण या गोष्टीकडे पण गांभीर्याने पाहिले पाहिजे. मुलींना जर पोहायला शिकवले तर कित्येक मुलींचे, महिलांचे जीव हे आपल्याला वाचवता येतील. कित्येक अपघात, कित्येक पाण्यात उडी मारून केल्या जाणाऱ्या आत्महत्या या कदाचित काही प्रमाणात टाळता येतील या बाबत अजिबात शंका नाही. आपल्या कुटुंबातील स्त्रियांच्या बाबतीत आपण गांभीर्याने विचार करत पोहायला शिकवले पाहिजे..!

Advertisement

लेखक : गणेश शिंदे (सरकार)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply