Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरण : ‘त्याही’ कार्यवाहीला झाली सुरुवात; पहा कोणत्या मुद्द्यावर फाईल सरकली पुढे

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायंस ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांच्या सामग्रीसह सापडलेली कार आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे याची चौकशी करीत आहे. त्याच वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे.

Advertisement

वाझे याच्यामुळे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली झाली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख या गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेले आहे. वाझे याने देशमुख आणि शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र लिहिलेले आहे. त्यामुळेही खळबळ उडालेली आहे. अशावेळी आता वाझे याचे पुढे काय होणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

दरम्यान, निलंबित असेलल्या वाझे याला बरखास्त करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाजे याला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून पुढे काय होणार अशीच उत्सुकता हे प्रकरण निर्माण करीत आहे. स्पेशल ब्रँचने एनआयएकडे कागदपत्रे मागितली होती. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर विशेष शाखेने घटनेच्या कलम 311 अन्वये वाझे याला थेट सेवेतून बरखास्त करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू केली आहे.

Advertisement

25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या घराजवळ एक कार सापडली. ज्यात स्फोटक सामग्री होती. तर, 5 मार्च रोजी कारचे मालक हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील कालव्यात सापडला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन काझी आणि माजी पोलिस कर्मचारी विनायक शिंदे आणि क्रिकेटर बुकी नरेश गोर यांनाही एनआयएच्या टीमने चौकशीदरम्यान अटक केली आहे. सोमवारी काझी याला निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply