Take a fresh look at your lifestyle.

उपवासात मोदीजी खाणार ‘हे’ पदार्थ; निवडणुकीच्या कालावधीत नवरात्रीचा उपवास चर्चेत..!

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या भावनेला हात घालण्याची अंगभूत कला आहे. जनतेच्या मनात घर करणाऱ्या गोष्टी करण्यात हातखंडा असलेल्या मोदीजींनी आता ऐन निवडणुकीच्या काळात उपवास सुरू केला आहे. त्यांच्या या उपवासाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्री हा मोठा उत्सव असतो. त्याच अनुषंगाने मोदींनी 9 दिवसाचा उपवास सुरू केला आहे.

Advertisement

आजपासून देशात चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना त्यानिमित्ताने संबोधित केले आहे. यासह पंतप्रधान मोदींचा नऊ दिवसांचा उपवासही आजपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी हे शक्तीचे उपासक असल्याचा दावा करतात. मोदी दोन्ही नवरात्रीच्या दिवसात नऊ दिवस उपवास करतात. यावेळी त्यांचा एक उपवास बंगाल निवडणुकीच्या मध्यभागी आलेला आहे.

Advertisement

शक्तीचे उपासक असलेले पंतप्रधान मोदी हे 40 हून अधिक वर्षे असा उपवास करत आहेत. या कालावधीत ते गरम पाणी पितात. उपवास कालावधीत पंतप्रधान मोदींची दिनचर्या पुढीलप्रमाणे :

Advertisement
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा पठणाद्वारे शक्ती देवीची पूजा करतात. या दरम्यान ते ध्यान करतात.
  2. या नऊ दिवसांत दररोज पठणानंतर सकाळी आणि संध्याकाळी देवी दुर्गाची आरती करतात.
  3. उपवास कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून एकदाच गरम पाणी आणि फळांचे सेवन करतात.

मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा नवरात्र उपवास बंगाल निवडणुकीसाठी खास ठरणार आहे. बंगालमध्ये शारदीय नवरात्रात दुर्गादेवीची मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. राज्यभरातील लोक यात सहभागी असतात. यंदा ही चैत्र नवरात्र बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. पीएम मोदींनी शारदीय नवरात्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगालच्या लोकांना संबोधित केले होते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply