Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या साखरेची ‘या’ देशाला गोडी; पहा कुठं झालीय सर्वाधिक निर्यात..!

मुंबई :

Advertisement

साखर उत्पादनात जगात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आपल्या साखरेची गोडी अनेक देशांना लागली आहे. त्यातूनच दरवर्षी भारत जगभर साखर निर्यात (Sugar Business and Export) करीत असतो. या वर्षीही आपण मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केली आहे. आपण जगभर साखर निर्यात करीत असलो तरी, यंदा एका देशाला आपल्या साखरेची चांगलीच गोडी लागल्याचे दिसते. चला तर मग जाणून घेऊ या हा कोणता देश आहे, शिवाय अन्य कोणत्या देशांना आपण किती साखर निर्यात केली आहे ते..

अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेनुसार (एआयएसटीए) सांगितले, की भारतीय साखर कारखान्यांनी या वेळी अनेक देशांबरोबर 3.3 दशलक्ष टन साखर निर्यातीचे करार केले आहेत, तर अन्न मंत्रालयाने 6 लाख दशलक्ष टन साखरनिर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आकडा या वर्षाचा, म्हणजे मार्केटिंग वर्ष 2019-20चा आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत साखरविक्रीचे वर्ष चालते. भारताने आतापर्यंत अडीच दशलक्ष टन साखर निर्यात केली असून, यावर्षीचे अजून पाच महिने शिल्लक आहेत.

एआयएसटीएच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांनी 1 जानेवारी ते 9 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 2.49 दशलक्ष टन साखरनिर्यात केली आहे. अतिरिक्त 3 लाख 3 हजार 450 टन साखर मार्गस्थ झालेली आहे. इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि श्रीलंका प्रमुख तीन खरेदीदार देश आहेत. गेल्या वर्षी इराणला सर्वाधिक साखरनिर्यात झाली होती. मात्र, यावर्षी चलनाच्या मुद्द्यावरून इराणला साखरनिर्यात होऊ शकली नाही.

एआयएसटीएचे उपाध्यक्ष राहिल शेख यांच्या म्हणण्यानुसार, प्रथमच इंडोनेशियातील व्यापाऱ्यांना साखर खरेदीची परवानगी मिळाली. त्याचबरोबर, ब्राझीलने डिसेंबर ते मार्च या कालावधीत ऑफ हंगाम केला. त्यामुळे इंडोनेशियाला अधिक माल पुरवण्यात यश आले, अन्यथा अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे आमचे नियमित खरेदीदार आहेत. यंदा युएईही भारताचा नवीन खरेदीदार झाला आहे.

कोणत्या देशाला किती साखर निर्यात झाली? (ता. 9 एप्रिलपर्यंत)
– इंडोनेशिया : 9 लाख 61 हजार 594 टन
– अफगाणिस्तान : 3 लाख 08 हजार 302 टन
– श्रीलंका : 2 लाख 46 हजार 391 टन

जून ते सप्टेंबर या तिमाहीत हंगामी कारणांमुळे निर्यातीत मंदी येऊ शकते. कोरोना महामारीनंतर लॉजिस्टिक अडचणी येऊ शकतात. लवकरच देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज 29.9 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांवर जाईल. त्याच वेळी, वापर 25.5 दशलक्ष टन होईल, असा अंदाज एआयएसटीएने व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply