Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन : अशी सुरू आहे महाराष्ट्रात तयारी; टाळेबंदीसाठी ‘हा’ असेल फुल प्रुफ प्लॅन..?

पुणे :

Advertisement

महाराष्ट्रात सध्या दररोज 50 हजाराहून अधिक नवीन करोना रुग्ण सापडत आहेत. रात्रीचा कर्फ्यू आणि शनिवार व रविवारचा विकेंड लॉकडाउन अशा अनेक निर्बंधांनंतरही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लॉकडाउन लादण्याची तयारी केली आहे. अधिकाऱ्यांच्या मतानुसार शक्यतो बुधवार 14 एप्रिल रोजी राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तत्पूर्वी फुल प्रुफ प्लॅन बनवण्याची तयारी चालू आहे

Advertisement

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या सरकारने लॉकडाऊनची तयारी सुरू केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत अटी व नियमांवर चर्चा केली आहे. राज्य सरकार सध्या राज्यात ऑक्सिजन पुरवठा, औषधे आणि अँटीवायरल उपाययोजनांची कमतरता कशी सोडवायची यावर विचार करीत आहे. कारण हे प्रश्न गंभीर बनले आहेत. याशिवाय राज्यात कमी दराने धान्य देण्याच्या योजनेवरही विचार केला जात आहे.

Advertisement

लॉकडाऊन दरम्यान कोणाला परवानगी द्यायची आणि किती दिवस लॉकडाऊन ठेवायचा याबाबत राज्य सरकार आराखडा तयार करीत आहे. मंत्री अस्लम शेख यांनी याबाबत सांगितले की, नागरिक बाहेर असतील किंवा लॉकडाउनपूर्वी त्यांना जायचे असेल तर त्यांना पुरेसा वेळ मिळेल. केंद्राला मुंबईतून सुमारे 50% महसूल मिळतो. आमच्या स्थलांतरित कामगार आणि लघुउद्योगांना मदत करण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारचे समर्थन आवश्यक आहे. आम्ही केंद्राला पॅकेज उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.

Advertisement

राज्य सरकार आगामी सण-उत्सवांसाठी कठोर एसओपीदेखील तयार करत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. ते म्हणाले की, उत्सवांसाठी कठोर एसओपी असतील. अन्यथा, हरिद्वार कुंभमेळ्यासाठी सरकारने दिलेल्या परवानगीमुळे कोविडची प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्रामध्ये घट झाली. शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनमुळे असे घडल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply