Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : बंगालमध्येही करोनाकहर; मृत्युदरात झाली मोठी वाढ..!

दिल्ली :

Advertisement

देशभरात करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना धार्मिक कार्यक्रम आणि निवडणूक ज्वर कायम आहे. आरोग्याच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्यात लाखोंच्या सभेचा अट्टाहास सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. तर, जनताही त्या निवडणूक उत्सवात सहभागी होऊन आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचाच फटका बसण्यास आता पश्चिम बंगाललाहे सुरुवात झाली आहे. आठ टप्प्यातील निवडणुकीच्या खेळात असलेल्या या राज्यातील मृत्युदर भयंकर वाढला आहे.

Advertisement

मागील महिन्यापासून या राज्यासह जिथे निवडणुका होत आहेत, त्या राज्यांचे करोना रुग्णांची आकडेवारी आणि इतर आरोग्य सेवा यांच्या बातम्या गायब आहेत. फ़क़्त निवडणूक हाच मुद्दा त्या राज्यामध्ये चर्चेत आहे. देशातील हिंदी व इंग्रजी माध्यमांसह स्थानिक वृत्तवाहिनीच्या बातम्यातूनही करोना आश्चर्यकारक पद्धतीने गायब झालेला आहे. मात्र, लाखोंच्या सभांचा फटका बसणार याची चर्चा असतानाच पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यात रुग्णसंख्या आणि मृत्यू यांचा दर वधारल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

निवडणूक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग का वाढत नाही, असे प्रश्न विचारले जात असतानच ही आकडेवारी पुढे येत आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचे संक्रमण निवडणुकांमुळे झपाट्याने पसरत आहे. पश्चिम बंगालमधील मृत्यूचे प्रमाण 1.7 टक्क्यांवर गेले आहे. जी टक्केवारी देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्राच्या बरोबरीची आहे. पश्चिम बंगालच्या पुढे फ़क़्त पंजाब आणि सिक्कीम हे राज्य आहेत. संपूर्ण देशात मृत्युदर 1.3 टक्के आहे. बंगालमध्ये तो जास्त असल्याने निवडणुकीच्या राज्यातही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे यातून दिसून येते आहे.

Advertisement

पॉजिटिविटी रेटच्या बाबतीतही पश्चिम बंगाल देशात सातव्या क्रमांकावर आहे. बंगालमध्ये कोरोनाचा पॉजिटिविटी रेट 6.5 टक्के आहे, तर संपूर्ण देशात हा आकडा फक्त 5.2 टक्के आहे. एकूण पॉजिटिविटी रेट हा चाचणीत संक्रमित आढळलेल्या लोकांच्या आधारावर मोजला जातो. याचा अर्थ असा की जर बंगालमध्ये, 100 लोकांची कोरोना टेस्ट झाली तर त्यापैकी 6.5 टक्के लोक संसर्गित झाले आहेत. ही सकारात्मकता चिंता निर्माण करणारी. बिहार, झारखंड, आसाम आणि ओडिशा या शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये केसेसमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. इथे फ़क़्त चवथ्या टप्प्यातील मतदान होत असून, पुढे राज्यात प्रचार फिव्हर आणि करोना कहर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply