Take a fresh look at your lifestyle.

गुढीपाडवा : म्हणून ‘या’ दिवसाला आहे इतके महत्व; वाचा महत्वाचे मुद्दे

आज गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जात आहे. करोना कालावधी असतानाही सर्वजण आपापल्या घरात आणि मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन भारतीय नववर्षाच्या स्वागतामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आज आपण या महत्वाच्या सणाबाबतचे महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.

Advertisement

मराठी विश्वकोश (मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यावरील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते.
  • ‘शालिवाहन’ हा ‘सातवाहन’ चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. 
  • शालिवाहन शकारंभही (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. 
  • वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. 
  • चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि लंकाविजयानंतर रामाने याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला, अशी एक कथा रूढ आहे.
  • प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. सु. ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत, असे इतिहासकार अल बीरूनीच्या लेखांवरून दिसते.
  • या तिथीला ‘युगादितिथी’ असेही म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. चैत्रापासून चार महिन्यांपर्यंत प्राणिमात्रास जलदान करावे, असे सांगितले जाते.
  • वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व त्याला स्वर्गातील अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला.
  • ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली, अशा कारणांनी हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक धार्मिक समजुती या सणामागे आहेत.
  • बांबूच्या किंवा कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. 

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

गुढी पाडवा (Gudhi Padwa) – मराठी विश्वकोश (marathivishwakosh.org)

Advertisement

गुढी पाडवा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती (marathi.gov.in)

Advertisement

Advertisement

Leave a Reply