Take a fresh look at your lifestyle.

खताची खरेदी करताना घ्या ‘ही’ महत्वाची काळजी; पहा नेमके काय केलेय ‘शिवार’ने आवाहन

पुणे :

Advertisement

यंदाच्या खरीपात खताच्या दरवाढीच्या बातम्या येत आहेत. मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च याद्वारे वाढणार आहे. अशावेळी खताची खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, अति तिथे माती, याच पद्धतीने खताचा बेसुमार घातक आहे. त्यामुळे एकूण खत खरेदी आणि वापर यामध्ये विशेष लक्ष देण्याचे आवाहन शिवार फाउंंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

Advertisement

त्यांनी केलेल्या आवाहनाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. खते व बियाणे खरेदी करताना कोणतीही अडचण आल्यास तत्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा.
  2. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ही सुविधा करण्यात आली आहे.
  3. शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करताना ई -पॉस मशिनमधून निघणारी छापील पावती न विसरता मागून घ्यावी व जपून पण ठेवावी.
  4. भविष्यात काही अडचण आल्यास ती पावती गरजेची असते. पावतीवरील छापील किंमत व खताच्या गोणीवरील छापील किंमत याची खात्री करून घ्यावी व मगच दुकानदार यांना पैसे द्यावेत.
  5. नवीन वाढीव दराची पावती देऊन खत मात्र जुनेच देणे हा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर काळजी घ्यावी.
  6. खतांची दरवाढ झाली किंवा नाही झाली याबद्दल सध्या शेतकरी वर्गात संभ्रम आहे. बाजारात मात्र वाढीव किमतीचा खत साठा उपलब्ध झालेला आहे.
  7. जुना खत साठा भरपूर प्रमाणात शिल्लक आहे तो जुन्या दरानेच विकला जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.
  8. कोणतीही तक्रार असल्यास तातडीने तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply