Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. सेवांच्या नावाखाली गरिबांच्या खिशात हात; पहा बँकांनी कसे लुटलेय आपल्याला..!

मुंबई :

Advertisement

सेवा हवी तर त्यासाठी खिशाला झळ बसणारच.. त्याला बँकिंग सेवांचाही अपवाद असू शकत नाही.. मात्र, काही मोठ्या बँकांनी सेवांच्या नावाखाली थेट गोरगरिबांच्याच खिशात हात घातलाय.. कसा ते तुम्हीच पहा..

तर मोदी सरकारने गोरगरिबांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये (Govt. Banks) जन-धन खाती उघडली. मात्र, आता ही खातीच बँकांसाठी कमाईचे साधन ठरली आहेत. झिरो बॅलन्सची (Zero Balance Penalty) सवलत दिलेल्या या खात्यांवरून महिन्याला चारपेक्षा अधिक व्यवहार झाल्यास, त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी बँकांनी तब्बल १८ रुपयांपर्यंत दंड आकारला आहे. त्यातून मागील ५ वर्षात स्टेट बँकेसह इतर बँकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या तिजोऱ्या भरल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीने (आयआयटी / IIT Mumbai or Bombay) केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली. मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी गरिबांसाठी जन-धन योजना सुरु केली. त्या अंतर्गत कोट्यवधी लोकांची खाती राष्ट्रीयीकृत बँकामध्ये उघडण्यात आली. त्याला बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट (बीएसबीडीए) असेही म्हणतात.

आता या खात्यावरून होणाऱ्या विविध सेवा आणि व्यवहारासाठी मोठा दंड आकारला जात आहे. या खात्यावरून दर महिन्याला चार पेक्षा अधिक व्यवहार झाल्यास १५ ते १८ रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. त्यात डिजिटल व्यवहाराचाही समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो?
– रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्हॅल्यू ऍडेड सेवांमध्ये महिन्याला चारहुन अधिक व्यवहाराचा समावेश आहे. त्यानुसार बँकांना या सेवांवर शुल्क आकारता येत नाही.
– बँका अनेकदा चुकीची आकारणी करतात. ग्राहकांनी ही बाब बँकाच्या लक्षात आणून दिल्यास शुल्क परतावा केला जातो.

कोणी कितीची लूट केली?
स्टेट बँक (State Bank of India) – खातेदार – १२ कोटी, मागील ५ वर्षांत केलेली वसुली – ३०० कोटी
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) – खातेदार- ३.०९ कोटी, वसुली – ९.०९ कोटी.

कोणत्या सेवांसाठी केली वसुली?
– बँक स्टेटमेंट (Bank / Loans Statement)
– बॅलन्स तपासणी (Balance Inquiry)
– मिनी स्टेटमेंट (Mini Statement)
– लिमिट विथड्रॉअल (Limit Withdrawal)
– होम ब्रँच अँड नॉन होम ब्रँच (Home Branch and Non Home Branche)
– मोबाईल अलर्ट किंवा पिन जनरेशन (Mobile Alert / PIN Generation)
– नवीन एटीएम कार्ड घेतल्यावर (New ATM Card)
– चेकचे स्टेटस जाणून घेतल्यावर (Chaque Status)
– पैसे ट्रान्सफर केल्यावर (Money Transfer)
– कार्ड पिन रिसेट केल्यावर (ATM Card Pin Reset)

एकीकडे देशात डिजिटल (Digital India) व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे त्यावरही दंड आकारणी सुरु सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्यापासून बँकाच अशाप्रकारे मर्यादा आणत असल्याचे दिसते. राजाने मारले नि पावसाने झोडपले तर सामान्यांनी दाद तरी कोणाकडे मागायची..?

Advertisement

संपादन : सोनाली पवार 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply