Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!

मुंबई :

Advertisement

देशातील वाढलेली लोकसंख्या ही उत्पादनाच्या कामात कितीही कमी-जास्त प्रमाणात उपयोगी असो. ग्राहक म्हणून जगाला या भारतीय लोकसंख्येचा हेवा वाटत आहे. जगाची ‘ग्राहकपेठ’ म्हून बनलेल्या भारतात सध्या अमेझॉन (amazon) आणि रिलायंस (reliance) या दोन दिग्गज ग्रुपची ‘रिटेल क्रांती’ (retail business) सुरू आहे. याच क्रांतीला हातभार लावताना अमेझॉन आणि रिलायंस यांच्या डोकेदुखीत आणि आव्हानात वाढ करण्यासाठी आता अदानी ग्रुप (adani group) सरसावला आहे.

Advertisement

जगभरात सध्या फास्टेस्ट ग्रोविंग बिजनेसमन म्हणून गौतम अदानी (Gautam Adani) यांची ओळख प्रस्थापित झालेली आहे. तिला आणखी ठोस आणि प्रभावी करण्यासाठी हे गुजराती उद्योजक आता रिटेल क्षेत्रातील दिग्गज अमेरिकी कंपनी वॉलमार्टसह (Wallmart) रिटेल बिजनेसच्या क्षेत्रात उडी घेत आहेत. दोन्ही कंपन्यांनी सोमवारी संयुक्त निवेदन जारी करून भारतातील या महत्वाच्या घडामोडीची माहिती जगाला दिली आहे. दोन्ही कंपन्यांमधील या कराराचे मुद्दे आणि परिणाम असे :

Advertisement
  1. भारताच्या रिटेल क्षेत्रात अॅमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी वॉलमार्ट-अदानी ग्रुप एकत्र
  2. अदानी पोर्ट्‌स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे युनिट अदानी लॉजिस्टिक्स मुंबईत यासाठी विशाल फुलफिलमेंट सेंटर तयार करणार
  3. ११ फुटबॉल मैदानासमान असलेल्या या सेंटरमधून एक कोटी युनिट इन्व्हेंटरी स्टोअर केल्या जाणार
  4. अदानी लॉजिस्टिक्स मुंबईत तयार केल्या जात असलेल्या आपल्या लॉजिस्टिक्स हबमध्ये ५.३४ लाख चौ. फुटाचे विशाल फुलफिलमेंट सेंटर तयार करून फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेसला भाडेतत्त्वावर  देणार
  5. वेअर हाऊसशिवाय फ्लिपकार्ट आपला तिसरा डेटा सेंटरही चेन्नईस्थित अदानीकनेक्स फॅसिलिटीमध्ये विकसित करणार आहे
  6. वॉलमार्टसोबत अदानीच्या या दोन्ही पार्टनरशिप रिटेल सेक्टरमध्ये गौतम अदानींच्या प्रवेशाची सुरुवात असल्याचा संदेश आहे
  7. वॉलमार्टचे भारतातील ई-कॉमर्स युनिट फ्लिपकार्ट आणि अदानी ग्रुपने हा महत्वाचा करार केला आहे.
  8. वेअर हाऊस २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत चालू होणार आहे
  9. देशात यामुळे रिटेल क्षेत्रातील स्पर्धा आणखी वाढणार
  10. जगभरात सध्या भारताला ग्राहकांचे केंद्रस्थान म्हणून मान्यता मिळत असल्याचे हे चिन्ह आहे

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply