Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी

अहमदनगर :

Advertisement

दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्या, असे ६९ टक्के मत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात मांडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याची मागणी या सर्वेक्षणाच्या आधारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते बाबा बोडखे यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी याबाबत म्हटले आहे की, दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घेण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने ही भूमिका शिक्षक परिषदेने मांडली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीदायक वातावरण आणि चिंता लक्षात घेऊन यावर सकारात्मक निर्णयाचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

सर्वेक्षणाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाने कोरोना काळातील परीक्षेबाबत ऑनलाइन सर्वेक्षण
  2. सुमारे तीन हजार पालक, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी आपले मत या सर्वेक्षणात नोंदवले
  3. ६९.३ टक्के लोकांनी परीक्षा पुढे ढकलून ती जून किंवा जुलै मध्ये घेण्याविषयी मत मांडले. यात यामध्ये शिक्षक ४५.५ टक्के, पालक ११.७ टक्के, विद्यार्थी व नागरिक ४० टक्के आहेत
  4. जून महिन्यात परीक्षा घेण्याचे मत ४२ टक्के लोकांनी तर ३३ टक्के लोकांनी जुलै महिन्यात तसेच २४ टक्के लोकांनी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे मत नोंदवले
  5. परीक्षा पुढे ढकलण्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल का? ६१ टक्के लोकांनी नुकसान होणार नाही, असे सांगितले

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply