Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 3 कारणांमुळे फोफावतोय करोना; पहा नेमके कोणते आहेत हे मुद्दे

मुंबई :

Advertisement

भारतातील कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरत आहे. वाढत्या रुग्नासंख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकार काळजीमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. त्याचवेळी 900 हून अधिक रुग्ण मरण पावले आहेत. अनेक राज्य सरकारांनी साथीचा रोग रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. परंतु संसर्ग थांबत नसून वाढत आहे. या वाढीबद्दल चिंता व्यक्त करतानाच संशोधकांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

Advertisement

गेल्या आठवड्यात दररोज एक लाखाहून अधिक रुग्ण वाढले आहेत. परंतु सोमवारी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशा परिस्थितीत लोकांसमोर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची अवस्था सामान्य होती. मग अचानकपणे साथीच्या रोगाची गती देशात कशी वाढली? यामागील काही करणे शास्त्रज्ञांनी दिली आहेत. आपल्या सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. देशातील काही शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या वाढत्या घटनांबाबत आपले मत मांडले आहे. तज्ञांनी नोंदवले की कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन न करणे आणि सुस्त लसीकरण मोहिम हे मुख्यतः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला जबाबदार आहेत.

Advertisement

पहिले कारण : दुसर्‍या लाटेत संक्रमणाचा प्रसार बर्‍याच वेगाने होत आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, संसर्गाचा प्रसार होण्याचे पहिले कारण म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन म्युटंट्सची निर्मिती. या नव्या उत्परिवर्तनाचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. नवीन उत्परिवर्तनांमुळे 15 ते 20 टक्के इतक्या वेगाने रुग्णसंख्या वाढ झाली आहे. भारताच्या अगोदर हा प्रकार इंग्लड, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सापडला होता. तिथेही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर टी जेकब जॉन याबाबत म्हणाले की, संसर्गाच्या बदलत्या प्रकारामुळे भारतातील कोरोना हा एक गंभीर समस्या बनला आहे.

Advertisement

दुसरे कारण : कोविड प्रोटोकॉलचे योग्यप्रकारे पालन न केल्याने कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. कोरोना व्हायरस साखळी नवीन वर्षात कमकुवत झाली होती. मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आजारात रुग्णसंख्या वाढली. भारतात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर बर्‍याच लोकांमध्ये कोरोनाचा धोका पूर्णपणे टाळता आला नाही. लोकांच्या आतून हा आजार नष्ट झाला नाही. दरम्यान, लोकांनी निष्काळजीपणाला सुरुवात केली. परिणामी रुग्णसंख्येचा उद्रेक दिसत आहे.

Advertisement

तिसरे कारण : शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले की सुस्त लसीकरण मोहीम हीदेखील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना जबाबदार आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एकीकडे लसीकरणाचे काम वेगाने चालू नाही. तर दुसरीकडे देशातील प्रत्येक गोष्टीवरुन निर्बंध हटविले जात आहेत. तसेच लसीकरण न करता धार्मिक आणि पर्यटन स्थळ सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लसीकरण न करता शाळा महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. हे निर्णय दुसर्‍या लाटेसाठी सर्वात जास्त जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत संक्रमणाचा प्रसार अटळ आहे.

Advertisement

व्हायरस वैज्ञानिक शाहिद जमील आणि प्रोफेसर टी जेकब जॉन यांच्या मते, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुसरी लहर तेजीत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की देशात लस घेणार्‍या ज्येष्ठांमध्ये अनेक गैरसमज होते. गोंधळाच्या परिस्थितीतही यंत्रणेने मोठ्या संख्येने लोकांनी लसीकरण केले. तथापि, लसीकरण मोहिमेचा वेग वाढला नाही. जेकब जॉन यांनी सांगितले की, जिथे जिथे संसर्गाचे प्रकार वाढत आहेत तेथे कठोरपणे निर्णयाची आवश्यकता आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply