Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या होम ग्राउंडमध्ये ABVP ला दणका; पहा नेमका काय लागलाय निकाल..!

बनारस :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदार संघातील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) पराभवाचा सामना करावा लागला आहे. विद्यापीठात रविवारी झालेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविप खातेदेखील उघडू शकलेले नाही. त्याचबरोबर काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट युनिय ऑफ इंडिया (एनएसयूआय) यांनी सर्व पद जिंकले आहेत. अध्यक्षपदी कृष्णा मोहन शुक्ला, उपाध्यक्षपदी अजितकुमार चौबे, सरचिटणीस म्हणून शिवम चौबे आणि ग्रंथालयमंत्री म्हणून आशुतोष कुमार मिश्रा यांची निवड झाली आहे.

Advertisement

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) चारही जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधानांच्या संसदीय मतदारसंघात काशी विद्यापीठानंतर एनएसयूआयने संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातील सर्व पदे आणि सर्व 7 विद्याशाखा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन म्हणाले आहेत की, हा विजय एनएसयूआयच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे. हा फ़क़्त एबीव्हीपीचा पराभव नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव आहे. कारण हा मोदीजींचा गड आहे. एनडीयूआयने त्यांचा किल्ला मोदीजींकडून काढून घेतला आहे. लवकरच ते संपूर्ण उत्तरप्रदेश ताब्यात घेतील.

Advertisement

एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश यादव म्हणाले की, एनएसयूआयचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत एबीव्हीपीने हिंसाचाराचा अवलंब केला. परंतु संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एबीव्हीपीच्या हिंसाचाराचे राजकारण नाकारले आहे.

Advertisement

B.P. Singh on Twitter: “बनारस के संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय छात्र संघ चुनाव में @nsui ने जबरदस्त प्रदर्शन कर सभी पदों पर जीत दर्ज की है। यह जीत युवाओं के बीच मोदी सरकार की शिक्षा और रोजगार में विफलता को उजागर करती है। सभी साथियों को बधाई! https://t.co/NuLFOLOEIw” / Twitter

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply