Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ

मुंबई :

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) फलंदाज नितीश राणाने सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध ५६ चेंडूत ८० धावांची तडाखेबाज खेळी करत रसिकांची मने जिंकली. नितीश राणाच्या डावात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. आयपीएलमधील नितीश राणा याचं हे १२ वं अर्धशतक होते. नितीश राणाच्या खेळीच्या जोरावर केकेआरने १८७ धावा केल्या आणि त्यानंतर हा सामना १० धावांनी जिंकला. नितीश राणा २०१८ पासून शाहरुख खानच्या केकेआरकडून आयपीएल खेळत आहेत.

Advertisement

नितीश हा अभिनेता गोविंदाचा नात्याने जावई लागतो. कपिल शर्मा शोमध्ये स्वत: नितीश राणा याने कबूल केले की होते की सुपरस्टार गोविंदाशी आपले नातेसंबंध आहेत. वस्तुत: कपिलच्या कार्यक्रमात गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने सांगितले होते की नितीशची पत्नी सांची मारवाह ही त्याची चुलत बहिण असून नितीश राणा हा त्याचा मेहुणा आहे. गोविंदाची भाची सांची मारवाहचा नितीश नवरा असल्याने तो गोविंदाचा जावई लागतो.

Advertisement

नितीशची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझाइनर असून नितीश आणि सांचीचे फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्न झाले. नितीश केकेआर संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या पत्नीबद्दल कोणाला फारसे माहिती नाही. सांची पण बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिने अंसल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन या विद्याशाखेतून शिक्षण घेतले आहे. सांचीने अनेक नामांकित इंटिरियर डिझाइनर्सकडून प्रशिक्षण घेतले आहे. दरम्यान, काल अर्धशतकानंतर नितीश राणा याने बोटाची अंगठी दाखविली. त्याने आपली ही खेळी पत्नी सांची मारवाहला समर्पित केल्याचे यातून स्पष्ट होते.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply