Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या सत्रात रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सने आपला सलामीचा सामना खेळला. यामध्ये सनरायझर्स हैदराबादला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मनीष पांडेने नाबाद ६१ धावा फटकावत सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण संघ सामना जिंकू शकला नाही. सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या पराभवासाठी मनीष पांडेला दोषी ठरवले आहे.

Advertisement

आस्क क्रिकबझ लाईव्हमध्ये एका चाहत्याने म्हटले की, मनीष पांडेला शेवटच्या सहा षटकांत फक्त एक षटकार ठोकता आला आणि याव्यतिरिक्त एकही चौकार त्याला मारता आला नाही. यावर सेहवाग म्हणाला, ‘हा प्रश्न मला देखील पडला आहे की शेवटच्या दोन-तीन षटकांत पांडेने स्ट्रोक्स का मारले नाहीत. त्याने मारलेला षटकार हादेखील शेवटच्या चेंडूवर आला, जेव्हा सामना संपला होता. शेवटच्या काही षटकांमध्ये पांडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत होता, त्याने सर्व दबाव सहन केला होता आणि तो सेटल झाला होता. जर त्याने येथे वेगवान धावा केल्या असत्या आणि चौकार ठोकले असते तर कदाचित १० धावांनी सामना गमवावा लागला नसता.

Advertisement

सेहवाग पुढे म्हणाला, ‘कधीकधी असे घडते की सेट झाल्यावरही चांगले शॉट मारण्याची संधी मिळत नाही. मला वाटते पांडेच्या बाबतीतही असेच काही घडले आहे. पांडेने शेवटी आक्रमकपणा दाखवला नाही, त्यामुळे सामना गमावला असल्याचे सेहवागचे मत आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १ बाद १८७ धावा केल्या. नितीशने ८० तर राहुल त्रिपाठीने ५३ धावांची शानदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरामध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ २० षटकांत पाच गडी बाद १७७ धावा करू शकला. मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, परंतु संघ जिंकू शकला नाही. मनीष पांडे ६१ धावा करून नाबाद राहिला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply