Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!

मुंबई :

Advertisement

क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणजे वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ब्रायन लारा. या कॅरिबियन खेळाडूने १२ एप्रिल या दिवशी मोठा विक्रम नोंदविला होता. १७ वर्षांपूर्वी त्याने कसोटीत वैयक्तिक सर्वोत्तम धावांचा विक्रम केला होता. १२ एप्रिल २००४ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात लाराने ४०० धावांची चमकदार खेळी केली होती. चार सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना अँटिगा येथे खेळला गेला, ज्याच्या तिसऱ्या दिवशी लाराने हा विक्रम केला. सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Advertisement

लाराच्या ऐतिहासिक ४०० धावांनी वेस्ट इंडिजला पहिल्या डावात ७५१ धावांची मजल मारण्यास मदत झाली. सामन्यादरम्यान इंग्लंडचा पहिला डाव २८५ धावांत गडगडला. दुसऱ्या डावात मायकेल वॉनच्या शतकामुळे इंग्लंडने सामना अनिर्णयीत राखला. आपल्या मॅरेथॉन डावात लाराने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३८० धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला होता. योगायोगाने हेडनने १९९४ मध्ये लाराचा ३७५ धावांचा विक्रम मोडला होता.

Advertisement

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येसुद्धा सर्वाधिक धावांचा विक्रम लाराच्या नावावर आहे. लाराने एजबॅस्टन स्टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वारविक्शायरकडून खेळताना ५०१ धावांची शानदार खेळी केली होती. २००७ मध्ये लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कारकिर्दीत त्याने एकूण २२ हजार ५३८ धावा केल्या. ज्यामध्ये ५३ आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply