Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा

मुंबई :

Advertisement

आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू झाला असून यंदाच्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादला १० धावांनी पराभूत केले. या सामन्यापूर्वी हैदराबादचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान सोशल मीडियावर केकेआरचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगच्या पत्नीबरोबरच्या कमेंटवरुन अप्रत्यक्षरित्या वाद घालताना दिसून आला.

Advertisement

वास्तविक अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. रशीद खानचे हे फोटो सराव सत्रातील होते. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये राशिदने लिहिले की, ‘मी सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’ या फोटोवर भाष्य करताना ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलँडने लिहिले आहे की, ‘सॉरी पण केकेआर मॅच जिंकणार आहे’. या टिप्पणीनंतर राशिद कुठे गप्प बसणार होता? याचे उत्तर देताना राशिद फार काही बोलला नाही पण त्याने फक्त लिहले की, ‘नाही’.

Advertisement

केकेआरने १० धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या होत्या. नितीश राणाने केकेआरसाठी सर्वाधिक ८० धावा केल्या. याशिवाय राहुल त्रिपाठीनेही अर्धशतक झळकावले होते. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ केवळ १७७ धावा करु शकला आणि केकेआरने हा सामना १० धावांनी जिंकला. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply