Take a fresh look at your lifestyle.

महत्वाचा निर्णय : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पहा काय म्हटलेय शिक्षणमंत्र्यांनी

पुणे :

Advertisement

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर केली आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार असून त्याचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Varsha Gaikwad on Twitter: “📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) https://t.co/cjeRZAT7ux” / Twitter

Advertisement

शालेय परीक्षांबाबतचे महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबतचा झाला निर्णय
  2. दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार
  3. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने घेतलेला निर्णय सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनीदेखील लागू करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे
  4. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने घेतला आहे
  5. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता
  6. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द झाली असली तरी विद्यार्थ्यांना स्वाध्याय आणि चाचणी परीक्षा द्यावी लागणार
  7. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रत्येक विषयासाठी स्वाध्याय किंवा चाचणी देऊन मूल्यमापन करण्यात येणार  

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply