Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राफेलप्रकरणी होणार ‘सुप्रीम’मध्ये सुनावणी; फ्रांसच्या पोर्टलवरील ‘गिफ्ट्स’च्या बातमीचा आधार..!

दिल्ली :

Advertisement

देशातील अत्याधुनिक लढाऊ विमाने राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याला निमित्त ठरले आहे फ्रेंच पोर्टलच्या बातमीचे. फ्रेंच कंपनी डॅसॉल्ट यांनी ‘गिफ्ट्स’ म्हणून तब्बल 8.62 कोटी रुपये दिल्याचे स्पष्ट झाल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयात यावर एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

Advertisement

बातमीमधील दाव्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर दोन आठवड्यांनंतर न्यायालय सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे म्हणाले की, कोर्ट याप्रकरणी तातडीने सुनावणी घेईल. तथापि, यासाठी त्यांनी कुठल्याही तारखेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

Advertisement

फ्रान्सच्या पोर्टलच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयातून स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यासाठी एम.एल. शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हा करार रद्द करावा आणि दंडासह संपूर्ण रक्कम वसूल करावी. तसेच या कोर्टाच्या देखरेखीखाली याची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. विमान बनवणाऱ्या फ्रेंच कंपनी डॅसॉल्टने भारतातील एकाला 8 कोटी 62 लाख रुपये दिल्याचा दावा पोर्टलने केला होता.

Advertisement

या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि सीबीआय यांनादेखील पक्षकार केलेले आहे . डसॉल्ट एव्हिएशनने यापूर्वीही हे आरोप फेटाळले आहेत. या करारात कोणताही भ्रष्टाचार किंवा अनियमितता नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून देशात खळबळ उडाली होती. दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या देखरेखीखाली राफेल कराराच्या चौकशीची मागणी करणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. दि. 14 डिसेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या सौद्याची प्रक्रिया आणि भागीदार निवडणुकीत कोणत्याही दलालाला घेतले असल्याचे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

Advertisement

फ्रेंच अहवाल समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबद्दल मोदी सरकारवर हल्ला केला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की, संपूर्ण व्यवहार करताना क्लायंटला भेट म्हणून स्पष्ट संबोधले जाते. हे मॉडेल तयार करण्यासाठी पैसे होते तर मग भेट म्हणून का म्हटले गेले? तो एखाद्या लपलेल्या व्यवहाराचा भाग होताका? सत्य सर्वांसमोर आले आहे. देशातील आम्ही किंवा किणीही नाही, तर एक फ्रेंच एजन्सी हे सर्व सांगत आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply