Take a fresh look at your lifestyle.

आणि जनतेनेच केला उत्स्फूर्त लॉकडाऊन; म्हणून सत्ताधारी भाजपने घेतला नव्हता निर्णय..!

भोपाळ :

Advertisement

महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लॉकडाऊन लागणार की नाही, यावर चर्चा चालू आहे. येथील सत्ताधारी महाविकास आघाडीने लॉकडाऊनचा ‘ल’ उच्चारला तरीही भाजपने विरोधाचा ‘व’ उच्चारण्याची तयारी ठेवली आहे. त्याचवेळी मध्यप्रदेश राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने राज्यात इतरत्र कर्फ्यू लावूनही निवडणुकीमुळे कर्फ्यू टाळल्याने स्थानिक जनतेने उत्स्फूर्त लॉकडाऊन केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे.

Advertisement

मध्यप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट बेकाबू झाली आहे. त्यामुळे राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता बहुतेक शहरांमध्ये शनिवार व रविवार लॉकडाउन करण्यात आलेला आहे.त्याचवेळी पोटनिवडणुकीमुळे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारने दमोह जिल्ह्यात वाढत्या संसर्ग होण्याच्या घटनांमध्येही लॉकडाउनचा निर्णय घेतला नाही. मग दमोहच्या लोकांनी आदर्श उदाहरण मांडत सरकारी आदेश नसतानाही दोन दिवस लॉकडाउन केला आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Madhya Pradesh: Locals in Hinota town of Damoh district observed self-imposed on Saturday & Sunday in view of rising COVID cases in the state. “Shopkeepers have voluntarily decided to keep their shops shut for two days. It can be further extended,” a local said yesterday. https://t.co/N0Y9DUycRB” / Twitter

Advertisement

मुख्यमंत्री चौहान यांना यांना विचारण्यात आले होते की, संपूर्ण राज्यात शनिवार व रविवार लॉकडाउन कधी लागू केले गेले आहे, परंतु दमोह जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्येही शनिवार व रविवार लॉकडाउन का लावला गेला नाही? त्यावर शिवराजसिंह चौहान म्हणाले की, दमोह हे त्यांच्या कार्यक्षेत्रात नाहीत. पोटनिवडणुकीमुळे दमोह निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे. म्हणून सरकारने तेथे कर्फ्यू लावला नाही.

Advertisement

हिनोता गावातील लोकांनी अमर उजाला दैनिकाला म्हटले आहे की, संक्रमण पसरत आहे. त्यामुळे लॉक चिंताग्रस्त आहेत. शहरात बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. कोरोना विषाणूमुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. त्यांच्यासाठी लॉकडाउन हा एक पर्याय होता. म्हणून स्वेच्छेने हे पाऊल उचलले आहे. गरज पडल्यास या दोन दिवसांच्या लॉकडाउनचा कालावधीही वाढविला जाऊ शकतो.

Advertisement

दमोह जिल्ह्यातील हटा ब्लॉकच्या हिनोता भागातील लोकांनी प्रशासकीय आदेशाची वाट न पाहता दोन दिवसांच्या साप्ताहिक लॉकडाउनचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन दरम्यान हिनोताची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे आणि लोक त्यांच्या घरात आहेत. अशा पद्धतीने येथील जनतेने एक वेगळा आणि सामंजस्याचा आदर्श ठेवला आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply